Kiran Kandolkar  Dainik Gomantak
गोवा

महिलांची संधी हिरावली; कांदोळकर यांचा आरोप

पंधरा वर्षांनंतर आरक्षण बदलणे आवश्‍‍यक होते

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने काल शुक्रवारी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठीचे आरक्षण जाहीर केले. परंतु महिलांच्‍या आरक्षणात घोळ आहे. ज्या प्रभागांत मागील वेळी महिलांसाठी आरक्षण होते, तेच कायम ठेवले आहे. पंधरा वर्षांनंतर ते बदलणे आवश्‍‍यक होते, जेणेकरून दुसऱ्या प्रभागांतील महिलांना महिला आरक्षणाद्वारे संधी मिळेल.

त्‍यांची संधी सरकारने हिसकावून घेतली असून तो या महिलांवर अन्याय आहे. सरकारने ही बाब लक्षात घेऊन महिलांच्या आरक्षणात बदल करावेत, अशी मागणी माजी आमदार किरण कांदोळकर (Kiran kandolkar) यांनी केली आहे.कांदोळकर म्हणाले की, थिवी मतदरासंघातील काही पंचायतींचे महिला आरक्षण कायम ठेवले आहे. पंधरा वर्षांनी आरक्षण बदल होत असल्याने सरकारने ते आरक्षण बदलायला हवे. पंधरा वर्षांत एखादी महिला तीनवेळा तेथे निवडून आली तर चौथ्यावेळीही ती महिला उमेदवारी दाखल करणारच. त्यामुळे शेजारील प्रभागांतील महिलांवर अन्‍याय होतोय.

राज्य सरकारने महिला आरक्षणाचे प्रभाग व्यवस्थितरित्या जाहीर करावेत. गरज पडल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत कांदोळकर म्हणाले की, सरकार आपला मनमानी कारभार करीत आहे. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे राज्य सरकार निवडणुका १० ऑगस्टला घेऊ पाहत आहे. परंतु महिला आरक्षणाचा सरकारने घोळ घालून ठेवल्याचे दिसते. त्यामागे कोणीतरी न्यायालयात जावे आणि निवडणुका पुढे जाव्यात असे सरकारला वाटत असावे, असा आरोपही कांदोळकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT