Women Empowerment: नागवां-सर्कल येथे स्थानिक स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना प्रदान करण्यात आलेल्या स्टॉल्सचे फीत कापून उद्घाटन करतांना महिला मोर्चाच्या सुषमा नागवेंकर, सोबत मंत्री मायकल लोबो, दिलायला लोबो , दत्तप्रसाद दाभोलकर व इतर : संतोष गोवेकर : संतोष गोवेकर.
Women Empowerment: नागवां-सर्कल येथे स्थानिक स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना प्रदान करण्यात आलेल्या स्टॉल्सचे फीत कापून उद्घाटन करतांना महिला मोर्चाच्या सुषमा नागवेंकर, सोबत मंत्री मायकल लोबो, दिलायला लोबो , दत्तप्रसाद दाभोलकर व इतर : संतोष गोवेकर : संतोष गोवेकर. Dainik Goamantak
गोवा

हाती सोपविण्यात आलेले कुठलेही काम 'यशस्वी' करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे..

दैनिक गोमन्तक

कळंगुट: हाती सोपविण्यात आलेले कुठलेही काम यशस्वी करण्याची क्षमता महिलांमध्ये असते परंतु पुरुष वर्चस्वाच्या ओझ्याखाली वर्षानुवर्षे दबल्या गेलेल्या स्त्रिला पुन्हां उर्जावस्थेत आणण्यासाठी तसेच स्वावलंबी (Women Empowerment) बनवण्यासाठी माझे शेवटपर्यंत प्रयत्न राहाणार असल्याने कळंगुटचे आमदार तथा गोवा राज्याचे मंत्री असलेल्या मायकल लोबो यांनी नागवां -बार्देशात सांगितले.

स्त्रीशक्ती मेळाव्याच्या निमित्ताने स्थानिक महिला मंडळाच्या संघटनांना सार्वजनिक दुकानांचे वितरण केल्यानंतर मंत्री लोबो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नागवां हडफडेंचे सरपंच राजेश मोरजकर, पर्राच्या सरपंच दिलायला लोबो, काणका -वेर्लाच्या सरपंच अमिता कोरगावकर, शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, आंसगावच्या उप-सरपंच रिया नाईक, ओशेल-शिवोलीच्या सरपंच वंदना नार्वेकर, सडये -शिवोलीचे सरपंच निलेश वायंगणकर, कळंगुट जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, कार्तिक कुडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्याच्या खाद्यपदार्थाची तुलना इतरांशी करतां येत नाही विशेष करून चणाभाजी, हॉमलेट पाव तसेच शाकुती चिकन आणी मटन खायचे तर गोमंतकीय महिलांच्याच हातचे परंतु दुर्दैवाने आपल्या महिलांना घरगुती पदार्थाची विक्री करण्याचे दालन उपलब्ध नसल्यानेच आंम्हा गोमंतकीयांना बाहेरील परप्रांतीय लोकांच्या हातचे पदार्थ बाजारात खावे लागतात.

परंतु काळानुसार ही परिस्थिती बदलली पाहिजे आणी त्याच हेतूने नागवां -हडफडे पंचायत क्षेत्रात स्थानिक कोमुनिदादच्या सहाय्याने स्थानिक महिलांच्या समुहांना त्यांनी स्वताच्या हातांनी बनविलेल्या घरगुती पदार्थांची खुलेआम विक्री करतां यावी या हेतूने नागवां सर्कल परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुषमा नागवेंकर, सडयेचे सरपंच निलेश वायंगणकर, पर्राच्या सरपंच दिलायला लोबो कळंगुटचे झेडपी दत्तप्रसाद दाभोलकर आदींची समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन सिनीपा गोवेकर यांनी तर आभार हडफडेचे सरपंच राजेश मोरजकर यांनी मानले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या मध्यावर मंत्री मायकल लोबो यांचे भाषण सुरु असतांनाच नुकतेच कॉग्रेसवासी झालेले म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर तसेच माजी नगराध्यक्ष तसेच कॉग्रेसचे नेते सुधीर कांदोळकर यांची नगरसेवक डॉ. नुतन बिचोलकर यांच्या सहित व्यासपीठावर आकस्मिक एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवयां उंचावलेल्या दिसल्या. यावेळी मंत्री लोबो यांनी आपल्या भाषणातून त्यांना व्यासपीठावर जाहीर आमंत्रण दिल्याचे राजकारणात काय बी होऊं शकते अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून ऐकायला मिळाल्या......

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT