Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022 : गोव्यात महिला काँग्रेसचे देवदेवतांना साकडे

सरकारच्या नाकर्तेपणाची शिक्षा लोकांना देऊ नका अशी प्रार्थना..

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटांतून गोवेकरांना वाचवावे तसेच येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला विजय मिळावा यासाठी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने गोव्यातील विविध मंदिरे,चर्चेस, मशिदी व गुरुव्दारांमध्ये जाऊन प्रार्थना केल्या.महिला कांग्रेस अध्यक्षा बीना नाईक (Bina Naik), अ.भा. महिला कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी डा. सीमा फर्नांडिस, गोव्यातील विविध गट महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी या आठवड्यात विविध धार्मिक स्थळांमध्ये जाऊन देवदेवतांना साकडे घातले. (women congress memebers in goa pray to god)

फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान, फोंडा यथील सफा मशिद, जुने गोवे येथील सेंट झेवियर चर्च व बेती येथील गुरुव्दारांमध्ये जाऊन ही करुणा भाकली. बीना नाईक यांनी सांगितले, की कोविड 19 च्या गत लाटेत साडेतीन हजारावर गोमंतकीय प्राणास मुकले. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे व रुग्णांना वेळीच प्राणवायुचा पुरवठा न झाल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला. यावेळीही तसेच होण्याची भीती वाटत असल्याने ते टाळण्यासाठी महिला कॉंग्रेसने (Goa Congress) विविध मंदिरे,मशीद,चर्च गुरूद्वारा आदी ठिकाणी जाऊन ही प्रार्थना केली व लोकांना वाचवावे, सरकारच्या (Goa Government) नाकर्तेपणाची शिक्षा लोकांना देऊ नका अशी प्रार्थना केली. कॉंग्रेसने सरकारला निवेदन सादर करून कोविडसंबंधी खबरदारी घेण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT