Pernem Crime News Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime News: न्हयबाग येथे आढळला महिलेचा मृतदेह, पिशवीत भरून झाडीत फेकले मृतदेहाचे तुकडे

रेल्वे पुलाजवळील झाडीत पिशवीत भरून मृतदेहाचे तुकडे टाकण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

न्हयबाग पेडणे येथे एका महिलेचा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. रेल्वे पुलाजवळील झाडीत पिशवीत भरून मृतदेहाचे तुकडे टाकण्यात आले आहेत. खून करून महिलेचा मृतदेह फेकण्यात आला असून, महिला 30 ते 35 वयोगटातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

(Women Body cut in pieces found at Naibag Pernem)

मिळालेल्या माहितीनुसार, पेडणे पोलिसांना रेल्वे पुलाजवळील झाडीत मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. यात छाती, पाय अशा अवयवांचा समावेश आहे. अवयव कुजलेल्या अवस्थेत आहेत. परिसरातील परप्रांतिय कामगारांना पहिल्यांदा हे अवयव आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत महिलेचा दोन दिवसांपूर्वी खून करून मृतदेह फेकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून, परिसरात अवयवांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. शनिवारी सायंकाळी चार वाजता पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.

सध्या पोलिस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. शेजारील सिंधुदुर्ग जिल्हातील देखील याचा काही संबंध आहे का याचा शोध देखील पेडणे पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT