Betul Woman Drowned  Dainik Gomantak
गोवा

Betul Woman Drowned: नाकेरी बेतुल येथे साळ नदीत बुडाली महिला

ओहोळातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

गोमंतक ऑनलाईन टीम

Betul Woman Drowned: नाकेरी, बेतुल येथे शेतात गेलेली एक महिला पाण्याच्या प्रवाहात ओहोळातून वाहत जाऊन साळ नदीला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कुंकळ्ळी पोलिसांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे.

शेतात गेल्यावर ओहोळ पार करताना अचानक पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला. त्यामुळे अंदाज न आल्याने ही महिला पाण्यात पडली आणि प्रवाहासोबत वाहून जाऊ लागली. यात तिला कशाचाही आधार न मिळाल्याने आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती ओहोळातून तशीच वाहत जाऊन पुढे साळ नदीला जाऊन मिळाली.

दरम्यान, या महिलेचा शोध घेतला जात आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत याबाबत काहीही अद्ययावत माहिती समोर आली नाही. स्थानिकांनी ही सर्व माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT