Mayem News Dainik Gomantak
गोवा

Mayem News: केळबाई देवस्थानावरील निर्बंध मागे घ्या- भाविकांची मागणी

मयेतील नाईक गावकर आणि भाविकांची एकमुखी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर खुले करताना डिचोलीच्या मामलेदारांनी जारी केलेल्या आदेशातील काही निर्बंध अन्यायकारक आहेत, असा दावा नाईक गावकर आणि इतर समाजातील भाविकांनी पत्रकार परिषदेत केला.

या आदेशानुसार भाविकांचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावले आहेत, असा दावा हरी नाईक गावकर आणि शिवा नाईक गावकर यांनी केला असून हे निर्बंध त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

सोमवारी केळबाई मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेस राजेंद्र नाईक, हरिश्चंद्र च्यारी, सत्यवान गावस यांच्यासह महिला मिळून 40 जण उपस्थित होते. 26 मार्च रोजी रात्री श्री केळबाईदेवीचे मंदिर बंद केले होते.

मंदिर प्रशासकांच्या या अटींना भाविकांचा आक्षेप:-

मंदिर खुले करताना डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांनी जारी केलेल्या आदेशात सात अटी घातल्या आहेत. त्यात पुजारी वगळता मंदिरात कोणालाही पूजा-अर्चा, अभिषेक आदी धार्मिक विधी करता येणार नाहीत.  

देवस्थानच्या कार्यकारी समितीकडून मंदिराची चावी घेऊन पुजारी नियमित पूजा करणार आहेत. भक्तांकडून देणगी स्वरूपात देण्यात येणारे साहित्य पुजारी वगळता अन्य कोणीही स्वीकारू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT