Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार ही 2 'निनावी पत्रे'?

Sonali Phogat Murder Case: एका भाजप नेत्याने दारुच्या नशेत सोनाली यांच्या हत्येची फुल प्रूफ योजना सांगितली.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Murder Case: भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारी सीबीआय आता सोनाली यांचा मेहुणा कुलदीप यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या दोन निनावी पत्रांचीही चौकशी करणार आहे. मात्र पत्र पाठवणाऱ्याने दोन्ही पत्रात आपले नाव दिलेले नाही. दुसरीकडे, एका भाजप नेत्याने दारुच्या नशेत सोनाली यांच्या हत्येची फुल प्रूफ योजना सांगितली होती. सुधीर सांगवानच्या माध्यमातून ती राबवली असा दावा करण्यात आला आहे. त्या बदल्यात सुधीरला 10 कोटी रुपये दिले असावेत.

'सोनालीच्या हत्येमागे भाजप नेत्याचा हात'

निनावी पत्र पाठवणाऱ्याने सोनाली यांच्या हत्येमागे भाजप नेत्यांचा हात असल्याचे सांगितले आहे. हे नेते आदमपूर, हिस्सार आणि टोहाना येथील आहेत. या पत्रांची माहिती सोनाली यांच्या कुटुंबीयांनी सीबीआयला दिली असून, आता या पत्रांची सीबीआय चौकशी करणार आहे.

सध्या सीबीआयही (CBI) या पत्रांना गांभीर्याने घेत आहे, कारण 20 वर्षांपूर्वी असेच एक निनावी पत्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना लिहिले होते आणि त्यात बाबा राम रहीमच्या कृष्ण कृत्यांबद्दल सांगितले होते. त्यानंतर दीर्घ तपासानंतर सीबीआयने हे पत्र स्वीकारले होते. पत्रात लिहिलेल्या गोष्टी तंतोतत बरोबर होत्या. त्यानंतर बाबा राम रहीमवर खून आणि बलात्काराचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर 2017 मध्ये बाबा राम रहीमला सीबीआय कोर्टाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हेच सर्वात मोठे कारण आहे की, सीबीआय आता आपल्या चौकशीत पत्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा समावेश करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT