Will the BJP government meet the demands of the ST community in Goa Dainik Gomantak
गोवा

'त्या' मागण्या होणार पूर्ण? चार आमदार निवडून आल्याने समाजामध्ये आशेचा किरण

'दोन आंदोलक हुतात्मे झाले, त्यामुळेच 2012 मध्ये भाजपचे सरकार गोव्यात सत्तेवर आले'

दैनिक गोमन्तक

मडगाव : 11 वर्षांपूर्वी आपल्या 11 मागण्या घेऊन बाळ्ळी येथे उटाच्या बावट्याखाली उग्र आंदोलन करणाऱ्या गोव्यातील एसटी समाजाच्या विधानसभेत राजकीय आरक्षण या मागणीसह तीन मागण्या पूर्ण व्हायच्या बाकी आहेत. निदान यावेळी तरी त्या पूर्ण होणार का?
या विधानसभेत एसटीचे चार उमेदवार निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला जात आहे. 12 टक्के राजकीय आरक्षणाबरोबर, अनुसूचित क्षेत्र अधिसूचित करणे आणि आदिवासी सल्लागार मंडळ स्थापन करणे या तीन मागण्या अजून पूर्ण व्हायच्या बाकी आहेत.

यावेळी एसटी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रमेश तवडकर, गोविंद गावडे या दोन माजी आदिवासी कल्याण मंत्र्यासह गणेश गावकर व आंतोन व्हाझ असे चार आमदार जिंकून आले आहेत. या तिन्ही मागण्या एसटीच्या कल्याणासाठी अंत्यंत महत्वाच्या असून यावेळी त्या मान्य होण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. यावेळी या मागण्या मान्य न झाल्यास या पुढे त्या कधीही मान्य होणे शक्य नाही असे मत उटा आंदोलनातील कार्यकर्ते आणि आदिवासी सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उपासो गावकर यांनी व्यक्त केली.

गावकर म्हणाले, वास्तविक 2017 त पुन्हा भाजपचे (BJP) सरकार आले त्यावेळी या मागण्या मान्य होतील अशी आमची अपेक्षा हीती. दुर्दैवाने ती पूर्ण होऊ शकली नाही. या मागण्या पूर्ण करण्यासाठी जसे काम व्हायला पाहिजे तसे झाले नाही. आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी (tribal) सल्लागार मंडळ स्थापन केलेही होते. पण, दुर्दैवाने या मंडळाची एकही बैठक झाली नाही.

गावडा, कुणबी, वेळीप व धनगर या चार जमातीच्या उत्कर्षासाठी लढणाऱ्या गाकुवेध फेडरेशनचे सरचिटणीस रुपेश वेळीप म्हणाले, आमच्या मागण्या घेऊन आम्ही उग्र आंदोलन केले. त्यात आमचे दोन तरणेबांड आंदोलक हुतात्मे झाले. त्यामुळेच 2012 भाजपचे सरकार गोव्यात सत्तेवर आले. याच आंदोलनाचे (Movement) नेते असलेले रमेश तवडकर 2012 मध्ये तर गोविंद गावडे 2017 मध्ये आदिवासी कल्याण मंत्री झाले. पण त्या दोघांनीही पुरेशा गांभीर्याने आमच्या मागणीकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे 10 वर्षे उलटली तरी आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

"एसटीना राजकीय (Politics) आरक्षण मिळणे गरजेचे असून 2012 मध्ये मी आदिवासी कल्याण मंत्री असताना यासाठी प्रयत्न सुरूही केले होते. दुर्दैवाने 2017 मध्ये मी हरलो आणि ही प्रक्रियाही संथ झाली. मात्र आता राहिलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू" अस मत आमदार (MLA) रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT