All India OBC General Dainik gomantak
गोवा

ओबीसी महासभा 'या' उमेदवारांना देणार समर्थन

ओबीसीचा बुलंद आवाज विधानसभेत पोचण्यासाठी ओबीसीचे आमदार विधानसभेत पोचणे गरजेचे आहे; शशीकांत घाडी

दैनिक गोमन्तक

अखिल भारतीय ओबीसी महासभेने राज्यातील काही मतदार संघात ओबीसी उमेदवार निवडून येण्याची शक्यता पडताळून पाहिली आहे, ते कोणत्याही पक्षाचे उमेदवार असले तरी त्यांची जिंकण्याची क्षमता बघून त्यांना समर्थन देण्यात येणार आहे. प्रामुख्याने काणकोण, शिवोली, पेडणे, शिरोडा, नावेली, मडगाव या मतदारसंघाचा समावेश आहे.

अखिल भारतीय ओबीसी (OBC) महासभा काही मतदार संघातील विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांना समर्थन देणार असल्याची घोषणा आज महासभेचे अध्यक्ष शशीकांत घाडी यांनी आज काणकोणात पत्रकार परिषद घेऊन केली.

काणकोणमधून कॉंग्रेसचे (Congress) उमेदवार जनार्दन भंडारी यांना अखिल गोवा ओबीसी महासभेने समर्थन देण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. यावेळी महासभेचे राज्य समन्वयक पंकज नमशीकर तसेच संतोष आखाडकर, रेंदर संघटनेचे अध्यक्ष रेमी बोर्जीस, शंभू नाईक, उमेश नास्नोडकर, रोहीदास मडगावकर, शंकर नाईक व अन्य उपस्थथि होते. गेल्या दोन वर्षात महासभेनेे वेेगवेळ्या मागणीची एकोणीस निवेदने सरकारला (Government) दिली. मात्र, त्याला मुख्यमंत्र्यांसहीत राज्यपालांनी प्रतिसाद दिला नाही. त्यासाठी ओबीसीचा बुलंद आवाज विधानसभेत पोचण्यासाठी ओबीसीचे आमदार (MLA) विधानसभेत पोचणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT