Sanjivani Sugar Factory  Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या जागेत प्रकल्प होऊ देणार नाही; ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक

इथेनॉलसंबंधी भूमिका १५ दिवसांत स्पष्ट करा

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory: येत्या पंधरा दिवसात सरकार इथेनॉल संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही 'संजीवनी'च्या जागेत कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा ऊस उत्पादक समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला.

यावेळी त्याच्यासोबत हर्षल प्रभुदेसाई, दयानंद फळदेसाई, फ्रांसिस मास्कारेन्हास, गुरुदास गाड व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उस उत्पादकांची उस तोडणी सध्या सुरू आहे. पुढे ऊस लावावा की नाही, या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी आम्हाला विचारणा करत आहेत. सरकारने जेव्हा आम्हाला इथेनॉल संदर्भात तुम्ही कंत्राटदार शोधावा, असे सांगितले होते, त्यानुसार आम्ही कंत्राटदारासहीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी आमच्या सोबत मंत्री सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन आज अनेक दिवस उलटले पण सरकारने अजूनही इथेनॉलसंदर्भात धोरण स्पष्ट केलेले नाही. येत्या पंधरा दिवसात सरकारने इथेनॉल संदर्भात आपले धोरण स्पष्ट करावे, अन्यथा आम्ही आंदोलन उभारू असेही ऊस उत्पादक राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

ऊस पिकवावा की नको ?

संपूर्ण गोव्यात या कारखान्यात सध्या ६०० उस उत्पादक कार्यरत आहेत. या सर्वांच्या शेतातील उसाची तोडणी येत्या काही दिवसांत होणार आहे. पुढे ऊस पिकवायचा की नाही, हे तरी समजायला पाहिजे, यासाठी सरकारने आपले धोरण स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे मत फ्रांसिस मास्कारेन्हास यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT