Govt Job to Miss Deaf India 2023 Dainik Gomantak
गोवा

Miss Deaf India 2023: मिस डेफ इंडिया 2023 विनिता सरकारी नोकरीच्या शोधात; आरोलकरांनी दिली हमी

सरकार दरबारी प्रयत्न करून प्राधान्याने विनिताला नोकरी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली

Kavya Powar

Govt Job to Miss Deaf India 2023: मोरजी गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचे काम विनिता शिरोडकर हिने केले आहे. तिला सरकारी नोकरीची आवश्यकता आहे. सरकार दरबारी प्रयत्न करून प्राधान्याने विनिताला नोकरी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

‘मिस डेफ वर्ल्ड’ स्पर्धेमध्ये आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकाची विजेती ठरलेल्या विनिताची तिच्या निवासस्थानी भेट घेऊन आरोलकर यांनी तिला नोकरीबाबत आश्‍वस्त केले.

यावेळी पंचसदस्य फटू शेटगावकर, केशव शेटगावकर, तियात्रिस्त फर्नांडिस उपस्थित होते. विनिताने याच वर्षी झालेल्या ‘मिस डेफ इंडिया’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर तिने आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि चौथा क्रमांक पटकावला.

आमदार आरोलकर म्हणाले की, विनिताने गोव्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिचे आणि तिच्या आईचे परिश्रम सर्वांनाच ठाऊक आहेत. विनिताला सरकारी नोकरीची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून विनिताला प्राधान्याने सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT