Vir Das VS Hindu Janajagruti Samiti Dainik Gomantak
गोवा

Vir Das:...तोपर्यंत विरोध कायम; गोव्यात कॉमेडियन वीर दास विरोधात हिंदू संघटना आक्रमक

स्टँडअप कॉमेडियन वीर दासचा बंगळुरू येथील शो रद्द करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन वीर दासने (stand-up comedian Vir Das) केलेल्या 'भारतविरोधी' वक्तव्याबद्दल गोव्यातील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. वीर दास माफी मागत नाही तोपर्यंत त्याला विरोध कायम राहणार असल्याचे हिंदू जनजागृती समितीने (Hindu Janajagruti Samiti) म्हटले आहे. काही संघटनांनी केलेल्या विरोधानंतर वीर दासचा बंगळुरू येथील शो रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर गोव्यातील हिंदू जनजागृती समितीने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

कॉमेडियन दासचे कार्यक्रम होतील तिथे त्यांची संघटना आंदोलन करत राहील. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पीटीआयला दिली आहे. वीर दासने गेल्या वर्षी अमेरिकेत "मैं दो भारत से आता हूँ" ही कविता सादर केली होती, ज्यावरून देशात बराच वाद निर्माण झाला होता. या कवितेतून देशाची बदनामी केल्याचा आरोप दासवर करण्यात आला आहे.

रमेश शिंदे म्हणाले, “कॉमेडियन वीर दासने अमेरिकेत केलेल्या भारताविरोधात वक्तव्याबद्दल त्याने माफी मागावी. आमचा त्याच्या विधानाला विरोध आहे, आम्ही विरोध केला नाही तर आम्ही त्याच्या बोलण्याचे समर्थन करतो असा त्याचा अर्थ होईल."

गुरुवारी हिंदू उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केलेल्या निषेधानंतर, स्टँडअप कॉमेडियन वीर दासचा बेंगळुरूमधील नियोजित शो शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT