Will BJP CM change face in Goa Devendra Fadnavis says central observers will come and legislature party meeting Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतायत..

त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे जाऊ; देवेंद्र फडणवीस

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व राज्यांतून काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाला आहे. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपने विजय मिळवून इतिहास रचला आहे, तर पंजाबमधील जनतेने मोठा बदल करून यावेळी आम आदमी पक्षाला (AAP) सरकार स्थापनेची मोठी संधी दिली आहे. देशातील सर्वात लहान राज्य असणाऱ्या गोव्यात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पणजीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला गोव्यात सरकार स्थापनेची घाई नसल्याचे स्पष्ट केले. अशा स्थितीत भाजप गोव्यात (goa) मुख्यमंत्री चेहरा बदलणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोव्यातील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत सांगितले की, भाजपचे 20 उमेदवार निवडून आले आहेत. एमजीपीने पत्र देऊन पाठिंबा दिला आहे, त्यांचे 2 उमेदवार आमच्यासोबत येणार आहेत. यासोबतच 3 अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. याशिवाय इतर पक्षातील उमेदवार देखील आमच्यासोबत येऊ शकतात. तसेच निवेदनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही 20 जागा जिंकल्या आहेत. एमजीपीनेही (MGP) आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. 3 अपक्ष आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता आम्ही 20+3+2=25 आहोत.

केंद्रीय निरीक्षक गोव्यात येतील, त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, सरकार स्थापनेच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आधी केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होईल मग केंद्रीय नेते गोव्यात येतील आणि विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यानंतर राज्यात सरकार (Government) स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे (Governor) जाऊ.

गोवा भाजपचे (BJP) अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, तीन अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा पत्र दिल आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू. अशा स्थितीत प्रमोद सावंत यांच्या नावावर अद्याप एकमत झाले नसून केंद्रीय नेते गोव्यात आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी अटकळ या वक्तव्यानंतर वर्तवली जात आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत म्हणाले की आमचा प्रयत्न 22+ जागा जिंकण्याचा होता, पण आम्ही 77 मतांनी 3 जागा गमावल्या. तसे झाले नसते तर आम्हाला 22+ जागा मिळाल्या असत्या. याचे सर्व श्रेय आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाच्या इतर नेत्यांना देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT