Tiger Census 2022 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 15 मार्चपासून व्‍याघ्रगणना

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

पणजी:गोवा सरकारचे वन खाते मार्चच्या पहिल्या आठवड्यात इकॉलॉजी सर्व्हे पूर्ण करेल आणि मार्चच्या मध्यापासून म्‍हणजे 15 तारखेपासून दर 4 वर्षांनी होणारा व्याघ्र सर्व्हे (गणना) करणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन संतोष कुमार यांनी दिली. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचे वन खाते, राष्ट्रीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय) आणि राष्ट्रीय व्याघ्रसंरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) यांची मदत घेण्यात येणार आहे, असेही ते म्‍हणाले.

राज्यात वाघांचा वावर प्राचीन काळापासून आहे हे येथील वाग्देवता मंदिरे, वाघ्रेश्वराची पूजा-पाठ, नैमित्तिक सामाजिक उत्सव यातून दिसून येत आहे. कदंब राजाचे राजचिन्ह याच मांजर कुळाला वाहिलेले आहे. यावरून वाघ इथल्या मातीतीलच आहे, हे स्पष्ट होते. मात्र मधल्या काळात बोकाळलेला खाण व्यवसाय व या धनदांडग्या खाण व्यावसायिकांच्‍या दबावाला बळी पडून वन खात्‍याने वाघ गोव्यात नाही हे सांगण्यापर्यंत मजल मारली होती. पण 2008-09 च्यादरम्यान वाळपई-सत्तरीतील वाघांचा वावर, नंतर त्‍यांची शिकार आणि अगदी परवा 2020 मध्ये झालेल्या चार उमद्या वाघांची हत्‍या यावरून वन खाते अधिकच सतर्क झाले आहे. राज्यात वाघ असल्याचे मान्य करून आता त्यांच्या गणतीची तयारी सुरू केली आहे.

‘या’ प्राण्‍यांचेहीकरणार सर्व्हेक्षण

सुरुवातीला आठ दिवस चालणाऱ्या इकॉलॉजिकल सर्व्हेमध्ये जाताना तृणभक्ष्‍यी (अर्बिहोर्स), मांसभक्ष्‍यी (कार्निव्होर्स) या दोन्ही गटांमधील प्राण्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यामध्ये गवे, सांबर, चितळ, पिसाय, मांजर कुळातील वाघ, बिबटे आणि लांडगे, कोल्हे, रानकुत्रे यांची माहिती घेण्यात येईल. परत येताना ही पथके झाडेझुडपे, वेली यांची गणती करतील. या घटकांच्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या अस्तित्वाच्या नोंदी ठेवल्‍या जातील.

देशात एकेकाळी लाखोंच्या संख्येने वाघ होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली वाघाची तस्‍करी व किंमत, नष्ट होणारा अधिवास, बेसुमार शिकार या कारणाने वाघ अस्तित्वासाठी लढत आहे. मोठ्या प्रमाणात असणारे वाघ आता हजारांत शिल्लक आहेत. देशाच्या जैवविविधतेच्या दृष्टीने वाघ एक महत्त्वाचा प्राणी आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय पातळीवरच्या व्याघ्रगणना मोहिमेत गोवा सहभागी होत आहे

- संतोष कुमार, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, मुख्य वन्यजीव वॉर्डन

इकॉलॉजी सर्व्हेक्षणानंतर मुख्य व्याघ्रगणनेला सुरुवात होईल. ही गणती एक महिना चालेल. यासाठी वाघांच्या वेगळ्या प्रकारच्या अस्तित्वाचे नमुने गोळा केले जातील. शिवाय राज्यातील सर्व अभयारण्यांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅपिंग लावण्यात येईल आणि या सर्वांच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्यात येईल.तो शेजारील राज्यासोबत शेअर केला जाईल. सध्या वनखात्यात वाघासाठी स्वतंत्र 'टायगर सेल' उभारण्यात आला असून त्याअंतर्गत सातत्याने सर्व्हेलेन्स सुरू आहे.

- ए.जेबस्टीन, उपविभागीय वन्यसंरक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT