wild boar death  Dainik Gomantak
गोवा

Illegal hunting : गोळी लागून रानडुक्कर मेल्याचा संशय; मेस्तवाड्यात शिकारी वाढल्या, "हैदोस थांबवा" स्थनिकांची वन विभागाकडे मागणी

Wild boar shot Goa: स्थानिकांनी वन खात्याला घटनेची माहिती दिली आणि आता वनखात्याकडून पंचनामा करण्यात आला आहे.

Akshata Chhatre

फोंडा: मेस्तवाडा- बेतोडा येथे जंगलात एक मृत रान डुक्कर आढळून आला होता.रविवार (दि.१८) रोजी आढळून आलेल्या या रान डुक्कराचा मृत्यू ४-५ दिवसापूर्वी अज्ञात शिकाऱ्याच्या बंदुकीची गोळी लागून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. स्थानिकांनी वन खात्याला घटनेची माहिती दिली आणि वनखात्याकडून पंचनामा करण्यात आला आहे.

वन खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या रान डुक्कराचा मृत्यू शिकाऱ्याची गोळी लागून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

हा संशय असतानाही वन अधिकाऱ्यांनी रान डुक्कराला पुरल्याची स्थानिकांनी दिली म्हणून वन अधिकाऱ्यांच्या कारभारावर स्थानिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान या परिसरात रात्रीच्या वेळी शिकार करण्याच्या प्रमाणात वाढ होत असून यावर वन खात्याने त्वरित लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जागा त्यांच्या वैयक्तिक आहेत मात्र तरीही बाहेरच्या गावातून येणारी काही लोकं इथे येऊन शिकार करून जातात. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिकार करताना मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि म्हणूनच मेस्तवाडा- बेतोडा येथे सुरु असलेल्या या शिकारीच्या प्रकरणांवर वन खात्याने बंदी घालावी अशी मागणी केली जातेय.

मेस्तवाडा- बेतोडा हे गाव जंगलाच्या नजदिक आहे. गावाबाहेरून येणारे शिकारी रात्रीच्यावेळी जंगलात शिकार करण्यासाठी जातात, आणि यामुळे रात्रीच्यावेळी कामावरून घरी परतत असलेल्या गावकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वन खात्याने वेळोवेळी गावकऱ्यांना सहकार्य केले आहे मात्र शिकारीचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याचा वापर वेर्णा तसेच नेस्ले कंपनीत जाण्यासाठी केला जातो, रात्रीच्यावेळी काम संपवून गावातील मंडळी घरी परतत असतात आणि अशावेळी सुरु असलेल्या शिकारीचा खेळ हा जीवघेणा ठरू शकतो अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळी तसेच संध्याकाळी बंदुकीचे आवाज येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. गोमंतकीयांनी वन वाचवली पाहिजेत, वन्य जीवांची काळजी घेतली पाहिजे असं म्हणत मेस्तवाडा- बेतोडा येथील स्थानिकांनी वन खात्याला या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT