Goa-bound Vistara flight diverted Dainik Gomantak
गोवा

विस्ताराच्या विमानाला दाबोळीवर लँडिंगची परवानगी का नाकारली? फ्लाईट केम्पेगौडाला वळवली

बेंगळुरूहून दुपारी 12.55 वाजता निघालेले हे विमान दुपारी 2.00 वाजता गोव्यात उतरणे अपेक्षित होते.

Pramod Yadav

Goa-bound Vistara flight diverted: बेंगळुरूहून गोव्याकडे निघालेले विस्तारा कंपनीच्या विमानला सोमवारी दुपारी दाबोळी विमानतळावर लँडिंगची परवानगी नाकारली, त्यानंतर विमान पुन्हा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले.

ही फ्लाईटने संध्याकाळी पुन्हा गोव्याकडे प्रस्थान केले. बेंगळुरूहून दुपारी 12.55 वाजता निघालेले हे विमान दुपारी 2.00 वाजता गोव्यात उतरणे अपेक्षित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विस्ताराच्या नवीनतम अपडेटनुसार या फ्लाईटने संध्याकाळी 5 वाजता पुन्हा बेंगळुरूहून गोव्याकडे प्रस्थान केले आणि सुमारे 6:15 वाजता दाबोळी विमानतळावर दाखल झाले.

दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवरील निर्बंधामुळे विमान माघारी वळवण्यात आले असे, विस्ताराने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका युझरलच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

"गोवा विमानतळावरील धावपट्टीवरील निर्बंधांमुळे फ्लाइट UK881 बेंगळुरूकडे वळवण्यात आली आहे. दुर्दैवाने, अशा परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. कृपया पुढील अपडेटसाठी संपर्कात रहा किंवा मदतीसाठी कर्मचार्‍यांशी संपर्क साधा," असे विस्ताराने म्हटले आहे.

फ्लाइट बेंगळुरूला वळवल्यानंतर संबंधित प्रवाशांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर संपर्क साधला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

SCROLL FOR NEXT