Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha: मी का माफी मागू , काय चुकले?

खासदार सार्दिन ः लाभार्थी दिव्यांग असले तरी वेळ पाळायलाच हवी

गोमन्तक डिजिटल टीम

दिव्यांग लाभार्थीला अपमानास्पद वागणूक दिल्याने दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी माफी मागावी, अशी मागणी होत असताना ‘मी कशाला मागू माझे काय चुकले’. सर्वांनी वेळ ही पाळायलाच हवी, अशा शब्दात सार्दिन यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.

दिव्यांगांसाठी तीन चाकी गाडी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात एक दिव्यांग लाभार्थी उशिरा आल्यावरून दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन हे त्याच्यावर संतापले होते. तसेच त्याला गाडी न देताच निघून गेले होते. त्यावरून खासदार सार्दिन यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यावर आता सार्दिन यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या खासदार निधीतून चार गाड्या दिव्यांगांना देण्यात आल्या. यावेळी दहा मिनिटे उशिरा आलेल्या एका दिव्यांग लाभार्थ्यावर खासदार सार्दिन संतापले होते शिवाय त्याला गाडी न देताच माघारीदेखील धाडले गेले होते.

लोकांनी वेळ पाळलीच पाहिजे !

खासदार सार्दिन म्हणाले की, लाभार्थ्यांना सकाळी 10. 30 वाजता यायला सांगितले होते. कारण सकाळी 11 वाजता माझी एक महत्वाची बैठक होती. तुम्ही जर लाभार्थी असूनही उशिरा कसे काय येऊ शकता?, मी त्यांना बाईक देण्यास विरोध केलेला नाही, किंवा टाळलेले नाही.

तर केवळ त्यांना रविवारच्या कार्यक्रमात येऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले आहे. लोकांनी वेळेवर यायला शिकले पाहिजे. लोकांनी वेळ पाळली पाहिजे. जर त्यांना विलंब होणार होता, तर तसे त्यांनी आधीच कळवायचे होते. लाभार्थ्यांसाठी आम्ही वाट पाहत थांबणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

Chimbel: चिंबल पठारावरील 'ती' जागा पूर्ववत करा; ग्रामस्थांकडून सरकारला 7 दिवसांची मुदत, पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ठिणगी आता गोव्यात; पाठिंबा वाढल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव अधिक तीव्र

Goa ITMS: 24 तासांत तब्बल 23.255 वाहतूक नियमांचे उल्लंघन! राज्यात 26 ठिकाणी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' प्रणाली कार्यान्वित

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

SCROLL FOR NEXT