Girish Chodankar | Goa Congress Dainik Gomantak
गोवा

सोन्याची तस्करी, सेक्स स्कँडल, पर्वरीतील गुन्हे यावर गप्प; चोडणकर म्हणतात सावंत 'मौन CM'

सेक्स स्कँडलमध्ये एका मंत्र्यावर आरोप होते, पण सत्य बाहेर येईल या भीतीने त्याची चौकशी झाली नाही - चोडणकर

Pramod Yadav

Goa Congress: सोन्याची तस्करी, सेक्स स्कँडल, जीएमसी औषध घोटाळा, पर्वरी येथील गुन्हे आणि पेडणे जमीन रुपांतरण आराखड्या सारख्या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मौनाबद्दल टीका करताना, कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ते ' मौन मुख्यमंत्री' बनले आहेत असा आरोप केला आहे.

“सरकारच्या विरोधात आंदोलने झाल्यावर त्याच्यावर भाष्य करणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. प्रमोद सावंत यांनी याचे भान ठेवावे. मात्र ज्या मुद्द्यांवर लोक आवाज उठवत आहेत, त्या मुद्द्यांवर ते उत्तर देत नाहीत आणि यामुळे भाजप सरकारकडून लूट सुरूच आहे. एक तर ते ‘मौन मुख्यमंत्री’ बनले आहेत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात समांतर मुख्यमंत्री आहेत."असे चोडणकर म्हणाले.

"गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा औषध खरेदी घोटाळा काँग्रेसने उघडकीस आणला आहे, जेथे निविदा नियमांना बगल देऊन वेलनेस फॉरएव्हर फार्मसीमधून औषधे खरेदी केली जातात. या फार्मसीला वास्तविक किंमतीपेक्षा जास्त पैसे दिले जातात. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे.

राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, मात्र मुख्यमंत्री याबाबत एक शब्दही बोलत नाहीत, असे चोडणकर म्हणाले.

गोवा सरकारमधील सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या मंत्र्याबाबत काँग्रेसने तक्रारही केली आहे, परंतु असंवेदनशील प्रमोद सावंत यांनी कारवाई केली नाही किंवा एक शब्दही काढला नाही. या मंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे आणि अटक करावी." अशी मागणी चोडणकर यांनी केली.

सेक्स स्कँडलमध्ये एका मंत्र्यावर आरोप होते, पण सत्य बाहेर येईल या भीतीने त्याची चौकशी झाली नाही, असेही चोडणकर म्हणाले.

"जर हा सेक्स स्कँडल झाला नसल्याची भाजप सरकारला खात्री होती, तर त्यांनी याची चौकशी करायला हवी होती. आरोपांना आधार होता आणि ही सत्य घटना होती म्हणून तसे केले नाही हे आता स्पष्ट झाले आहे," असे ते म्हणाले.

“मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, आमच्या ‘ नंदनवन’ गोव्याला ‘नष्ट' करु नका, ज्यामुळे लोकांना त्रास होईल," असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT