Goa Weather Update | Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : कधी होणार राज्यात मान्सून दाखल, हवामान खात्याने दिली माहिती

नैऋत्य मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा नैऋत्य मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रवास गोव्याच्या दिशेने सुरू होणार आहे. राज्यात 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. मॉन्सूनचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे.

सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रात दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

येत्या काही दिवसात अरबी समुद्रात चक्रीय वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासोबतच बिहार, बंगाल, आणि सक्कीम राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाट असणार आहे. राज्यात येत्या दोन दिवसात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांसहित काही भागात तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

दरम्यान बुधवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत कुडचडे शहराला झोडपून काढले होते. कुडचडे बाजारातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले होते तर काही ठिकाणी दुकानात पाणी घुसल्याने कुडचडे बाजारात लोकांची तारांबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Conflict: "इराणला नमतं घ्यावंच लागेल!" ट्रम्प यांचा तेहरानला निर्वाणीचा इशारा; अण्वस्त्रांचा हट्ट सोडल्याशिवाय कोणताही करार नाही

Goa IIT: गोव्याची जमीन वळवण्याचा डाव फसला? आयआयटीसाठी आता फक्त 4 लाख चौ.मी. जागा; केंद्रानं 10 लाखांचं धोरण बदललं

IPL 2026 Playoff Scenario: मुबंई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती! एका पराभवानं 'प्लेऑफ'चं स्वप्न भंगणार; जाणून घ्या समीकरणं

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया होणार मर्यादित, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून रिपोर्ट पाठवणार केंद्राला; मंत्री खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

Budh Gochar 2026: ''आर्थिक चणचण संपणार, गुंतवणुकीतून मिळणार अमाप पैसा'', 5 राशींच्या लोकांची चांदीच चांदी; बुध गोचरमुळे आयुष्यात येणार सुखाचे दिवस

SCROLL FOR NEXT