Vice President Jagdeep Dhankhar In Goa 
गोवा

Vice President In Goa:...आणि उपराष्ट्रपतींनी 94 वर्षीय गोव्यातील शेतकऱ्याच्या चरणांना स्पर्श केला

गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांच्या वामन वृक्ष कला या पुस्तकाचे प्रकाशन नव्या दरबार हॉल येथे पार पडले.

Pramod Yadav

Vice President Jagdeep Dhankhar In Goa: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांच्या वामन वृक्ष कला या पुस्तकाचे प्रकाशन नव्या दरबार हॉल येथे पार पडले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला व्यासपीठाकडे जाताना धनकड यांनी गोव्यातील 94 वर्षीय शेतकऱ्याच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर काही काळ चर्चा करून धनकड व्यासपीठाकडे गेले.

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या 200 व्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आयोजित कार्यक्रमात धनखड प्रमुख पाहुणे होते.

उपराष्ट्रपती राजभवनाच्या नवीन दरबार हॉलमध्ये आले आणि व्यासपीठावर जाण्यासाठी निघाले त्यावेळी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्यांपैकी विश्वनाथ गंधाधर केळकर यांच्यावर त्यांची नजर गेली.

पारंपरिक धोतर परिधान करुन आलेल्या केळकर यांच्याशी संवाद साधला. काही काळ चर्चा केल्यानंतर धनकड केळकर यांच्या चरणांना स्पर्श करुन व्यासपीठाच्या दिशेने पुढे गेले.

यावेळी धनकड यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई उपस्थित होते.

"धनकड यांच्या कृतीने मी भारावून गेलो, मला स्वर्गाची अनुभूती वाटली. राज्यपालांच्या निमंत्रणावरून मी येथे आलो. राजभवनात येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती," असे भावनिक उद्गार केळकर यांनी काढले.

1961 मध्ये पोर्तुगीज राजवटीतून राज्य मुक्त झाल्यानंतर डिचोली तालुक्यातील सुर्ला पंचायतीचे पहिले उपसरपंच म्हणून केळकर यांनी काम केले होते.

विश्वनाथ गंधाधर केळकर यांनी आयुष्यभर फक्त शेती केल्याचे यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT