Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: पणजीतील खोदकामाबाबत काय म्हणाले सावर्जनिक बांधकाम मंत्री, वाचा सविस्तर...

महापौरांसह केली कामांची पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांकडुनही पाहणी

गोमंतक ऑनलाईन टीम

PWD Minister Nilesh Cabral on work in Panjim: सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सोमवारी पणजीत सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामांची पाहणी केली.

यावेळी मंत्री काब्राल यांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत पणजी महापालिकेसोबत मिळून काम करू, असे सांगितले.

मंत्री काब्राल म्हणाले की, फ्लडिंग होण्याचे कारण म्हणजे ज्यांनी अगोदर हे काम केले होते तेव्हा ते कसे केले होते, याची काहीच कल्पना आम्हाला नाही. या ड्रेनज लाईन्समध्ये खूप माती साचून राहिली आहे.

त्या कारणाने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. हे सगळं ठीक करण्यासाठी आम्हाला एक वर्ष तरी लागेल.

म्हणजेच या वर्षी येथे फ्लडिंग होईल की नाही याबाबत आत्ता मी काहीच सांगू शकत नाही. पण पावसाळ्यामध्ये काही अडचण उद्भवली तर आम्ही म्हणजे पीडब्ल्यूडी खाते आणि पणजी महापालिका मिळून काम करू.

दरम्यान, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामु हागे यांनीही सोमवारी सांतीनेज येथे स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. सांतीनेज जंक्शन ते काकुलो मॉल या मार्गावर सुरू असलेल्या कामांची माहिती घेत, काँट्रॅक्टरला ही कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT