Pundalik Naik Dainik Gomantak
गोवा

'गोव्याची राजभाषा कोणती, हा आमचा अंतर्गत प्रश्न'

पुंडलिक नाईक: महाराष्ट्राला नाक खुपसण्याचा अधिकार कोणी दिला?

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात राजभाषा कोणती असावी, कोकणी की मराठी, हे ठरविण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात महाराष्ट्राला नाक खुपसण्याचा अधिकार कोणी दिला, असा परखड सवाल राजभाषा आंदोलनातील ‘कोकणी प्रजेचो आवाज’ या संघटनेचे निमंत्रक पुंडलिक नाईक यांनी केला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांना उद्‍गीर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून नंतर भाषावादावरून त्यांचा त्याच व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी त्यांचा अपमान केले. त्यावर सध्या साहित्य विश्वात गदारोळ माजला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणीतील ज्येष्ठ लेखक पुंडलिक नाईक यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

मावजो यांना निमंत्रित करून त्याच संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांचा अपमान करणे हा औचित्यभंग असून या वृत्तीचा आणि कृतीचा निषेध करणेच योग्य ठरेल. कौतिकराव सारखी माणसे अजूनही असल्याने हा भाषावाद चिघळत राहिला आहे. कौतिकराव आणि त्यांच्या वृत्तीचे साहित्यिक म्हणजे मराठी साहित्य शारदेच्या भव्य वटवृक्षावर आलेली बांडगुळे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. ''माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच'' ही महाराष्ट्राची विस्तारवादी वृत्ती नेणारे हे प्रतिनिधी असे खेदाने म्हणावे लागते, असे नाईक म्हणाले.

वास्तविक मावजो यांना मराठी संमेलनाचे आमंत्रण मिळाल्यानंतर माझ्यासारख्या अनेक साहित्यिकांना आनंद झाला होता. महाराष्ट्राची भाषावादाबद्दलची भूमिका बदली असे वाटले होते. महाराष्ट्राच्या या समन्वयी भूमिकेचे आम्ही मानापासून स्वागत केले होते. मात्र कौतिकरावांनी औचित्यभंग केलाच. असे जरी असले तरी सगळेच महाराष्ट्रीय साहित्यिक या वृत्तीचे आहेत, असे म्हणणे उचित ठरणार नाही, असे मत नाईक यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT