RG Loksabha candidate Asset Dainik Gomantak
गोवा

RG candidate Asset: मनोज परबांपेक्षा रुबर्ट परेरा अधिक श्रीमंत, जाणून घ्या कोणाची किती संपत्ती?

RG Loksabha candidate Asset: उत्तरेतून मनोज परब तर दक्षिणेतून रुबर्ट परेरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pramod Yadav

RG Loksabha candidate Asset

गोव्यातून आज (गुरुवार) रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उत्तरेतून मनोज परब तर दक्षिणेतून रुबर्ट परेरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आरजीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आरजीच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरजीचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा उमेदवार परब यांच्यापेक्षा दक्षिण गोवा उमेदवार परेरा अधिक श्रीमंत आहेत.

मनोज परब यांनी प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 3.12 लाख असल्याचे समोर आले आहे. परब यांनी 2022-23 वर्षासाठी दाखल केलेल्या आयकर परताव्यानुसार त्यांनी कोणतेही उत्पन्न दाखवलेले नाही. परब यांची 42,649 रुपयांची मुदतठेव असून, एमपी लाईफस्टाईल कंपनीचे शंभर रुपयांचे 900 शेअर्स त्यांच्याकडे आहेत.

याशिवाय त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची एक कार देखील असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. परब यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तर, रुबर्ट परेरा यांनी 27.63 लाखांची मालमत्ता असल्याची शपथपत्रातून माहिती दिली आहे. परेरा यांच्या आयकर परताव्यानुसार, त्यांचे 2.65 लाख उत्पन्न असल्याचे समोर आले आहे. परेरा यांनी बारवीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे.

इंडिया आघाडीसोबत चर्चेसाठी अद्याप पर्याय खुला

परब यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरजीचा इंडिया आघाडीत सामील होण्याचा पर्याय अद्याप खुला असून, यासाठी आघाडीला २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.

दरम्यान, आघाडीत समील होण्यासाठी आरजीने तीन अटी ठेवल्या आहेत. यात म्हादईचे संरक्षण, कोमुनिदाद जागेवरील बेकायदेशीर घरांवर कारवाई आणि पोगोची स्विकृती यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT