Grafting Training Dainik Gomantak
गोवा

आंब्यांच्या झाडाचे कलम कसे करावे? गोवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घेतले प्रात्यक्षिक

Grafting: कोणत्या आम्रवृक्षावर कलम करणे सोयीस्कर असते याविषयी या विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले.

Avit Bagle

डिचोली: मयेतील बागायतदारांना आंब्यांच्या झाडावर कलम कसे बांधावे याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह गोवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले. या विद्यार्थिनी ग्रामीण जागृती कार्य अनुभवांतर्गत सध्या मये येथे वास्तव्याला आहेत.

सुसान कॉस्ता, माझिया फर्नांडिस, अंकिता बगळे, सुश्मिता रेडकर, आणि मनिषा भावदान या विद्यार्थिनींनी कलम का केले पाहिजे याचे महत्व बागायतदारांना पटवून दिले. शास्त्रोक्त पद्धतीने कलम करण्याची योग्य पद्धत कोणती.

कोणत्या आम्रवृक्षावर कलम करणे सोयीस्कर असते याविषयी या विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले. उत्पादन वाढीसाठी कलमी आंब्यांची लागवड कशी आवश्यक आहे यावर बागायतदारांशी त्यांनी चर्चाही केली.

Grafting Training

हे विद्यार्थी मये परिसरातील शेतकरी, बागायतदारांना गेला महिन्याभरात मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षणही दिले आहे. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया कशी करता येईल आणि त्या परिसरात कोणती उत्पादने घेता येतील याविषयीचे सर्वेक्षणही या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Grafting Training

मये परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे भात शेती पाण्याखाली गेली होती. दुबार पेरणी करण्यासाठी शेतकरी नाखूश होते. या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन भातशेती का केली पाहिजे याविषयीचे महत्त्व त्यांना पटवून दिले. आणखीन दोन महिने हे विद्यार्थी मये परिसरात शेतकरी बागायतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT