Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: आरजीचे अध्यक्ष, उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांच्याविरोधात कोणते पाच गुन्हे दाखल आहेत?

Manoj Parab: परब यांच्याविरोधातील सर्व गुन्हे सार्वजनिक मुद्यांवर केलेल्या आंदोलनांशी संबधित आहेत.

Pramod Yadav

Manoj Parab

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (दि.१९) लोकसभेसाठी अर्ज दाखल केले. उत्तरेतून पक्षप्रमुख मनोज परब आणि दक्षिणेतून रुबर्ट परेरा यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना पक्षाच्या वतीने शक्तप्रदर्शन केले.

परब यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

परब यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यात आली आहे. परब यांच्याविरोधातील सर्व गुन्हे सार्वजनिक मुद्यांवर केलेल्या आंदोलनांशी संबधित आहेत.

माहितीनुसार, वाळपई पोलिस स्थानकात दोन तर पणजी, फोंडा आणि म्हापसा पोलिस स्थानकात प्रत्येकी एक गुन्हा नोंद असून, सर्व प्रकरणात न्यायालयात खटले सुरु आहेत.

'ते' पाच गुन्हे कोणते?

मनोज परब यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मेळावली येथील आयआयटीच्या प्रकरणात दोन, स्थलांतरीतांचे बेकायदेशी वास्तव्य प्रकरणी एक, कुचेलीचे मैदान बचावासाठी केलेले आंदोलन आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मेहुण्याच्या भ्रष्टाचार विरोधात केलेले आंदोलन याप्रकरणी एक, असे एकूण पाच गुन्हे नोंद असल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

दरम्यान, माझं आयुष्य गोवा आणि गोयंकारांसाठी समर्पित असून, माझा लढा असाच सुरु राहील असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT