West Bengal Governor C V Anand Bose  Dainik Gomantak
गोवा

Saint Xavier Exposition: पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; विशेष व्हॅटिकन शिष्टमंडळानेही दिली भेट

West Bengal Governor C V Anand Bose Visit SFX Exposition: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी जुने गोव्यात येऊन सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेतले. बोस सध्या गोव्याचे दौऱ्यावर आलेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

West Bengal Governor C V Anand Bose Visit Saint Xavier Exposition

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा सुरू झाला असून देशभरातून भाविक गोव्यात पोहोचत आहे. आज पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी जुने गोव्यात येऊन सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेतले. बोस सध्या गोव्याचे दौऱ्यावर आलेले आहेत.

शवप्रदर्शन सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्यापासून देशभरातून तसेच राज्यातून भाविक जुने गोवा येथे पोहोचत आहे. तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून मोठ्या संख्येत भाविक आले आहे.

गोव्यातून सुद्धा मोठ्या संख्येत भाविक येत असून येणाऱ्या दिवसांमध्ये हा आकडा वाढणार आहे. गोव्यातील शाळा देखील आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेवप्रदर्शनाला येत आहे. आज फोंडा येथील जामिया शाळेच्या विद्यार्थींनी भेट देत धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. यात बहुतांश विद्यार्थी हे मुस्लिम समुदायातील होते.

व्हॅटिकन शिष्टमंडळाची भेट

एका विशेष व्हॅटिकन शिष्टमंडळाने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या दशवार्षिक पवित्र अवशेष प्रदर्शनाला भेट दिली. या शिष्टमंडळान मॉनसिग्नॉर जेवियर डॉमिंग फर्नांडिस यांचा समावेश होता. अवर सचिव श्रेयस डिसिल्वा यांनी स्वागत केले. तर महसूल सचिव संदिप जॅकिस यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. आर्चबिशप एडगर पेना पर्रा या शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT