Monsoon Canva
गोवा

Goa Rain Update: चार दिवस ऑरेंज अलर्ट; पावसाची शतकी खेळी

Goa Monsoon: राज्यात सामान्य पावसाच्या तुलनेत तब्बल ५७.२ टक्के अधिक पाऊस

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात ४ जूनपासून सुरवात झालेल्या मॉन्सूननंतर अवघ्या ४६ दिवसांत पावसाने इंचांचे शतक पार केले. आतापर्यंत २५१८ मिमी म्हणजेच ९९.१३ इंच पावसाची नोंद केली आहे. मात्र, शनिवारी राज्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण याला जोडल्यास राज्यात पावसाने निश्‍चितपणाने शतक पार केले आहे.

राज्यात सामान्य पावसाच्या तुलनेत तब्बल ५७.२ टक्के अधिक पाऊस राज्यात बरसला आहे. पुढील चार दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५५ मिमी म्हणजेच २.१६ इंच पावसाची नोंद केली.

पेडण्यात सर्वाधिक ८८.४ मिमी पाऊस नोंदविला. त्याखालोखाल काणकोण ८४.२ मिमी, वाळपई ७२.५ मिमी, साखळी ६५.६ मिमी, म्हापसा ६१ मिमी, दाबोळी ५२.४ मिमी, सांगे ५०.५ मिमी, जुने गोवे ५२ मिमी, मुरगाव ४५.६ मिमी, फोंडा ४२.४ मिमी, पणजी ४०.२ मिमी, केपे ४०.२ मिमी, मडगाव २९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT