Goa News DAinik Gomantak
गोवा

Goa: "ग्रामीण पत्रकारांच्या निवृत्ती वेतनासाठी प्रयत्न करू"

डिचोलीत पत्रकार कक्षासाठी सरकारने जागा उपलब्ध करून दिली असून, लवकरच खास कार्यक्रमाव्दारे या कक्षाचे उदघाटन होणार आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: ग्रामीण पत्रकारांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार. अशी ग्वाही डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली आहे. डिचोली पत्रकार संघातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात सभापती पाटणेकर प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. आज पत्रकारिता आणि पत्रकार यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

अशा परिस्थितीत लोकमान्य टिळक यांच्या पत्रकारितेचा आदर्श नजरेसमोर ठेवून लोकविश्वासाहर्ता टिकवून ठेवावी. असे आवाहनही सभापती पाटणेकर यांनी केले. यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष रविराज च्यारी, सचिव तुकाराम सावंत, खजिनदार राजेश चोडणकर, विशांत वझे, दुर्गादास गर्दे, समीर उमर्ये, उदय परब, काशिनाथ मयेकर, दिलिप देसाई, विनायक सामंत, दिलिप देसाई, जीवन कळंगुटकर, चंदू मांद्रेकर, संदीप पिळगावकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सभापती राजेश पाटणेकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामनाथ देसाई यांनी पत्रकारांसमोरील आव्हाने मांडली. रविराज च्यारी यांनी स्वागत केले. दुर्गादास गर्दे यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम सावंत यांनी आभार मानले. उपस्थित पत्रकारांनी लोकमान्य टिळक यांना मानवंदना दिली.

पत्रकारांसाठी कक्ष

डिचोलीत पत्रकार कक्षासाठी सरकारने जागा उपलब्ध करून दिली असून, लवकरच खास कार्यक्रमाव्दारे या कक्षाचे उदघाटन होणार आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर आणि साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळेच पत्रकार कक्षासाठी जागा उपलब्ध झाली आहे. पत्रकारांना एकत्र येता यावे. यासाठी जागा मिळावी. अशी पत्रकारांची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्याबद्दल डिचोली पत्रकार संघाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती राजेश पाटणेकर यांना धन्यवाद दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT