GMC.jpg
GMC.jpg 
गोवा

आम्ही प्रचंड मानसिक तणावाखाली आहोत; जीएमसी डॉक्टर्स 

दैनिक गोमंतक

पणजी : राज्यातील वाढते मृत्यूदर आणि वाढत्या रुग्णसंख्येचा डॉक्टरांवर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMC Doctors) मधील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.  राज्यात रोज वाढणारे रुग्ण आणि होणाऱ्या मृत्यूमुळे डॉक्टरांवर मानसिक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  बुधवारी झालेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोव्यात चोवीस तासात 45 जणांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या झाल्याचे म्हटले आहे. त्यांचे मानसिक दुखणे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही संपूर्ण कारकीर्दीत एकाच वेळी इतक्या रुग्णांचा मृत्यू पाहण्याची सवय लावतो आहोत.  परंतु या आकड्यांमध्ये नाही आणि इतक्या लवकर नाही. बऱ्याच तरूणांनाही लागण झाली आहे. सर्व पाहताना आम्हाला प्रचंड मानसिक  त्रास होत आहे. '' अशी खंत जीएमसी डॉक्टरांनी केली आहे.  (We are under tremendous mental stress; GMC Doctors) 

कोरोनाने मृत्यू होणाऱ्या बहुतेक रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे गंभीर रुग्ण असून त्यांच्या  सीटी स्कॅनचे रिपोर्टही अत्यंत खराब आहेत.  तर काही रुग्णांवर योग्य उपचार आणि पुरेसे ऑक्सिजन मिळत आहेत. मात्र बरेच असे रुग्ण आहेत, जे अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करत आहेत, असेही जीएमसी डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही दबाव सहन करू शकतो,  परंतु रुग्णांचे नातेवाईक नाही. आपल्या कुटुंबातील प्रियजनांना अक्षरश: श्वास घेताना आणि मारताना होणारा त्रास  नातेवाईक सहन करू शकत नाहीत.  आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविण्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करतात. आम्हीही तेच करत आहोत,'' असेही जीएमसी डॉक्टरांनी सांगितले आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  108267 वर पोहचली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 29752 इतकी आहे. एका दिवसात 3869 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  तर एकाच दिवसांत 2023 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  तर 58 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर  गेल्या पाच दिवसात 333 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.  त्यामुळे गोवा डॉक्टरांवरील ताण वाढत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT