Bicholim bus stand  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील पर्यायी बसस्थानकावर पाणी तुंबल्याने समस्या

चिखलाची दलदल : उपाययोजनेची मागणी

दैनिक गोमन्तक

डिचोली : गुरुवारपासून पडलेल्या पावसात डिचोलीतील पर्यायी बसस्थानकावर पाणी तुंबण्याचा प्रकार घडला. गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत या बसस्थानकाची स्थिती एखाद्या तळ्यागत झाली होती. पाणी तुंबल्याने बसस्थानकावर चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शुक्रवारी दिवसभर प्रवासी तसेच बसस्थानकावरील दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागला. (waterlogging at alternative bus stand in Bicholim)

अवकाळी आणि जोराचा पाऊस नसताना पर्यायी बसस्थानकाची ही हालत, तर भर पावसाळ्यात संततधार आणि जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर बसस्थानकावर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता दुकानदार आणि प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी बसस्थानकावरील चिखलाच्या दलदलीत दोन दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

पाणी आणि चिखल

बसस्थानकावरून प्रवासी बसगाड्या बाहेर घेतात त्याठिकाणी तर चिखलाची दलदल निर्माण झाली. बसस्थानकावरील पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

उपाययोजना करा

अजून मोसमी पाऊस सुरू व्हायचा आहे. या बसस्थानकावर पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही, तर पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. बसस्थानकावर पाय ठेवणेही अशक्य होणार आहे, असे नझीर बेग आणि अन्य प्रवाशांनी सांगितले. सरकारने या बसस्थानकावर विनाविलंब गटार वा अन्य आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT