Waterfalls in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील धबधब्यांकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षित

शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसात देशी व परदेशी पर्यटक या धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणातील बामणबुडो, तुडला व कुस्के धबधबे वाहू लागले आहेत. मात्र, पावसाने अद्याप गती न घेतल्याने ते पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरूवात झाली नसली तरी धबधब्याचे मनोहारी सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांचे या धबधब्यांकडे पाय वळू लागले आहेत. (b)

शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसात देशी व परदेशी पर्यटक या धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. बामणबुडो हा धबधबा गावडोंगरी पंचायत क्षेत्रात गावडोंगरी नेत्रावळी रस्त्याच्या आंबेघाट परिसरात रस्त्याच्या कडेला आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांची गर्दी खेचत आहे. याच पंचायत क्षेत्रात तुडल येथे दुसरा धबधबा आहे. (Tourism News in Goa)

खोतीगाव पंचायत क्षेत्रात कुस्के येथे खोतीगाव अभयारण्याच्या कक्षेत कुस्के हा धबधबा असून या धबधब्यावर जाण्यासाठी वनखात्याची परवानगी आणि प्रवेश शुल्क भरावा लागतो. वनखात्याने या धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट तयार केली आहे. हा धबधबा काणकोण मधील अन्य धबधब्यापेक्षा सर्वाधिक उंचीवरून पडणारा धबधबा आहे. हे सर्वच धबधबे काणकोण तालुक्याच्या चावडी या मध्यवर्ती ठिकाणाहून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहेत. मात्र, अद्याप या धबधब्याचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT