Water Tanker Accident Dainik Gomantak
गोवा

Water Tanker Accident: कला अकादमीजवळील रस्त्यावर फुटले पाण्याच्या टॅंकरचे चाक; सुदैवाने जीवितहानी नाही

नगर नियोजन खात्याला याची माहिती मिळताच सदर टॅंकर तिथून हटवण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Water Tanker Accident: दररोज सुरूच असलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये आणखी एक भर म्हणून पणजीच्या मुख्य रस्त्यावर एक ट्रकचा अपघात घडला आहे. कला अकादमीजवळील रस्त्यावर ही घटना घडली असून यामध्ये पाण्याच्या टॅंकरचे चाक फुटले.

एके ठिकाणी पाणी नेत असताना कला अकादमीच्या रस्त्यानजीक वॉटर टॅंकरचे चाक अचानक फुटले आणि त्याची रस्त्याच्या दुभाजकाला धडक बसली. यामुळे काही काळ वाहतूक थांबली होती. त्यानंतर नगर नियोजन खात्याला याची माहिती मिळताच सदर टॅंकर तिथून हटवण्यात आला.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काल दुपारी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पर्वरीत बुधवारी (दि.19) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात जखमी झाल्यानंतर युवकाला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नहिम बशीर भंडारी (वय 21, रा. हाळीवाडा- बिठठोण) असे या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT