aqueduct Dainik Gomantak
गोवा

Water Supply Crisis: कोलवाळमध्ये जलवाहिनी फुटली ; बार्देशात पाणीपुरवठ्याचे संकट

पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांनी पाहणी केली तेव्हा गवळीवाडा-कोलवाळ येथे तिलारी कालव्याच्या बाजूने जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Water Supply Crisis Mapusa : म्हापसा कोलवाळ-गवळीवाडा येथे १००० एमएमची मुख्य जलवाहिनी फुटल्याने बुधवारी बार्देश तालुक्यात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. ही जलवाहिनी जंगलात असल्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला असून आठवडाभर तालुकावासीयांना पाणीसमस्येचा सामना करावा लागेल.

सदर जलवाहिनी १००० एमएमची आहे. या जलवाहिनीमार्फत बार्देश तालुक्यातील थिवी, म्हापसा, कळंगुट, हळदोणा, साळगाव अशा मतदारसंघात पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, जलवाहिनी फुटल्याने वरील भागांत पाणी समस्या निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपासून नळाला पाणी नसल्याने लोकांचे मात्र प्रचंड हाल झाले.

जलवाहिनीचा जोड तुटल्यामुळे जलवाहिनीला गळती लागली असून ही घटना मंगळवारी रात्री घडली असावी अशी शक्यता साबांखा अधिकार्यांनी व्यक्त केली. बुधवारी सकाळी वरील मतदारसंघांतील जलकुंभांमध्ये पाणी पडत नसल्याने जलवाहिनी फुटल्याचा हा प्रकार समजला.

पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांनी पाहणी केली तेव्हा गवळीवाडा-कोलवाळ येथे तिलारी कालव्याच्या बाजूने जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले.

या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. त्यानंतर, लगेच कर्मचाऱ्यांनी सदर जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली.

पाण्याच्या दाबामुळे दगड माती वाहून जाऊन घटनास्थळी एखाद्या दरडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माणझाला आहे.

मर्यादित पाणीपुरवठा

कोलवाळ येथे एक हजार एमएमची जलवाहिनी फुटल्यामुळे गुरुवार १९ व शुक्रवार दि. २० रोजी बार्देश तालुक्यातील काही भागात मर्यादित पाणीपुरवठा होणार असल्याचे साबांखाच्या पाणीपुरवठा विभागाने सार्वजनिक नोटीसीद्वारे कळवले आहे.

यात म्हापसा मतदारसंघ, थिवी, मयडे, नास्नोळा, उसकई, बस्तोडा, सडये, मार्ना, ओशेल, वेर्ला-काणका, आसगाव, कांदोळी, कळंगुट व पर्वरी मतदारसंघातील काही भागाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT