Water Shortage Problem mandrem Dainik Gomantak
गोवा

Mandrem Water Shortage Issue: मांद्रे मतदारसंघात पाणी समस्या गंभीर; टँकरद्वारे पाणीपुरवठा

पंचायत मंडळांनी मांडली गाऱ्हाणी

दैनिक गोमन्तक

Mandrem Water Shortage Issue: मांद्रे मतदारसंघात दिवसेंदिवस पाण्याची गंभीर समस्या बनत आहे.

आतापर्यंत केरी, तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, तुये व विर्नोडा या गावातील काही सरपंच, उपसरपंच, पंच, नागरिक, सामाजिक संस्था व बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी विभागाला भेट देऊन पाण्याची समस्या मांडलेली आहे.

प्रत्येकवेळी अधिकारी पाण्याची समस्या सुटणार, असे आश्वासन देतात. परंतु ज्यावेळी एखादी संस्था किंवा एखाद्या पंचायत क्षेत्रातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतात.

त्यावेळी त्या परिसरात नळांना पाणी येते आणि काही ठिकाणी पाण्याचा पत्ताच नाही, अशी स्थिती मांद्रे मतदारसंघात निर्माण झाली आहे.

एका बाजूने पाण्याची गंभीर समस्या असताना आजपर्यंत एकाही पंचायत मंडळाने ज्यावेळी ग्रामसभा असेल, बैठका असतील त्यावेळी यावर कधी विचार किंवा चर्चा केली नाही.

सरकारचे टँकर आहेत कुठे?

मांद्रे मतदारसंघात पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार आरोलकर प्रयत्नशील असले तरी ज्या ठिकाणी आजही नळांना पाणी येत नाही. त्या ठिकाणी ते पदरमोड करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. सरकारचे टँकर कुठे पोहोचतात.

याचाही काही पत्ता नाही. मांद्रे मतदार संघातील जनतेला पाण्यासाठी सध्या वणवण करावी लागत आहे.

नागरिक संतापले

मोरजी पंचायत क्षेत्रातील मुणांगवाडा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. पाणी आज येणार, उद्या येणार किंवा दिवसाआड येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु पाण्याचा काही पत्ता नाही.

त्यानंतर या संतप्त नागरिकांनी मागच्या चार दिवसांपूर्वी ऑपरेटरला घेराव घालून आम्हाला पाणी कधी मिळेल, याचा जाब विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT