Water Shortage Problem Dainik Gomantak
गोवा

Water Shortage Problem: धरणांनी गाठला तळ; राज्यात पाण्याच्या तीव्र टंचाईची भीती

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Water Shortage Problem: भारतीय हवामान खात्याने राज्यात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ढग कोरडे आणि पाऊस गायब झाला आहे.

अशातच हवामानाचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या खासगी जागतिक संस्थेने पुढील चार आठवडे भारतातील मॉन्सून कमजोर असेल असे जाहीर केले आहे.

त्यामुळे राज्यासह देशासमोरचे पाण्याबाबतचे संकट आता तीव्र होताना दिसत आहे. यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पर्यायी पाण्याच्या व्यवस्थेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी म्हणाले, राज्यात सध्या पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध आहे. खांडेपार, ओपा आणि म्हादईमध्ये पुरेसे पाणी आहे. मात्र, अंजुने धरणाचा पाण्याचा साठा कमालीचा कमी झालेला आहे.

तो केवळ 4 टक्के उरला आहे. यावर पुढील आठवडाभर पाणी प्रकल्प चालवता येतील. त्यामुळे केरी परिसरात पाणीटंचाई तीव्र होऊ शकते.

स्कायमेट या संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदाचा देशातला मॉन्सून सरासरीपेक्षा कमी असेल.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे सर्वांचेच अंदाज चुकवत नैऋत्य मौसमी मॉन्सून आठ दिवस उशिरा 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला आणि तो झपाट्याने विक्रमी वेळेत अवघ्या चार दिवसांत केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा करत महाराष्ट्रात दाखल झाला.

हवामान खात्याने मॉन्सूनची वाटचाल कायम असल्याचे सांगितले असले, तरी पावसाने मात्र ठेंगा दाखवला आहे. राज्यात आज आभाळ कोरडे आणि निरभ्र अनुभवास आले

पंचवाडी धरण कोरडे झाले आहे. मात्र, तिळारी, साळावली, आमठाणे आणि चापोली धरणात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. कमी झालेले पाणीसाठे हा चिंतेचा विषय आहे.

पाऊस लांबल्यास अन्य विभागातून पाणी वळवण्यासाठी काय करता येऊ शकेल यावर अभ्यास सुरू आहे. सध्या याबाबत कोणतीच यंत्रणा नाही, मुख्य अभियंते प्रमोद बदामी म्हणाले.

महाराष्ट्रातील तिळारी धरणातून उत्तर गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. या धरणात पुरेसा पाणीसाठा आहे.

सध्या साळावली धरणातून २.५० क्युबिक मीटर आणि अंजुने धरणातून १.२० क्युबिक मीटर पाणी सोडण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT