Water Shortage in Quepem
Water Shortage in Quepem  Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: पिण्याच्या पाण्याविना केपेत गावकऱ्यांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Water Shortage in Quepem : गोव्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. केपे तालुक्यातील खड्डे हे गाव खूप वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तळमळत आहे. गेल्यावर्षी निवडणुकीच्या आधी माजी आमदार बाबू कवळेकर यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची बांधणी करून निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी त्याची सुरुवात केली. ती फक्त दोन दिवस चालू झाली नंतर ठप्प पडलेल्या टाकीला अजूनपर्यंत ढुंकून सुद्धा कोणी बघितले नाही, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

'हर घर जल' या योजनेच्या माध्यमाने लोकांच्या घरात मीटरची जोडणी केलेली आहे; पण त्या मीटर बॉक्सना जोडून दीड वर्षे व्हायला आली तरी सुद्धा त्यांना कनेक्शन दिले नसल्याचे लोक सांगतात. या सगळ्या गोष्टींना कंटाळून लोकांनी स्वतःहून पैसे काढून गावात असलेल्या दोन जऱ्यांना पाईपलाईनचे कनेक्शन देऊन ते सिंटेक्स टाकीमध्ये पाणी भरून प्रत्येक घरात पाणी पुरवण्याची सुविधा केली आहे.

पण हे पाणी मे महिना आला की आटते; ज्यामुळे त्यांना दुसऱ्या कुठल्याही गावात जाऊन ड्रम मध्ये पाणी भरून आणावे लागते. या सर्व गोष्टींमुळे गावकरी हैराण झाले आहेत.

दरम्यान, याचबाबत मंत्री नीलेश काब्राल यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा टंचाईच्या समस्यांबद्दल त्यांना माहिती आहे. ते म्हणाले की विभागातर्फे यावर काम सुरू आहे आणि 15 एप्रिलपासून घरांना दिवसातून चार तास खात्रीशीर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT