Mining Dump in Bicholim  Dainik Gomantak
गोवा

धोकादायक अवस्थेत असलेल्या लामगाव खंदकातील पाणीउपसा लांबणीवर

दुसऱ्या बाजूने याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना संबंधित खाण कंपन्यांना करावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली : धोकादायक अवस्थेत असलेल्या लामगावच्या माथ्यावरील खंदकातील पाणी उपसा करण्‍याचे काम लांबणीवर पडले आहे. येत्या एक-दोन दिवसांत हे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूने याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना संबंधित खाण कंपन्यांना करावी लागणार आहे. तशे निर्देशही प्रशासकीय यंत्रणेने या कंपन्यांना दिले आहेत.

आज सोमवारी पणजीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत खंदकांची सद्य:स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी संबंधित खाण कंपन्यांनी पेलावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यावर खाण खात्याचे नियंत्रण राहणार आहे. आवश्यकतेनुसार जलसंसाधन खात्याकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

दरम्‍यान, लामगाव खंदकातील पाण्याचा उपसा आजपासून करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तसे संकेतही दिले होते. मात्र आजच्या उच्चस्तरीय बैठकीमुळे हे काम लांबणीवर पडले आहे. आता हे काम कधी सुरू होतेय, त्यायाकडे लामगावसह डिचोलीतील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT