Water Pipeline is broken again in goa Dainik Gomantak
गोवा

पुन्हा पाण्याची नासाडी; जलवाहिनीला पुन्हा भगदाड

या जलवाहिनीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपयव्य चालू आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: राज्य महामार्गाअंतर्गत येणाऱ्या बगलमार्गावर नाईकनगर-बोर्डे परिसरात मोठी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली असून, या जलवाहिनीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपयव्य चालू आहे. ही जलवाहिनी नेमकी कधी फुटली, त्याची निश्चित माहिती मिळाली नसली, तरी गेल्या आठवड्यात ही जलवाहिनी फुटल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. नाईकनगर भागातील एका नागरिकाने या माहितीस दुजोरा दिला.

(Water Pipeline is broken again in goa)

बगलमार्गावर बांधकाम चालू असलेल्या छोट्या पुलाजवळून पाणी वाहत आहे. हा प्रकार काल सोमवारी निदर्शनास आला. असे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या जलवाहिनीतून पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून अस्नोडा प्रकल्पात पाणी पुरवण्यात येत आहे.

नाईकनगर-बोर्डेच्या परिसरात बगलमार्गावर बांधकाम चालू असलेल्या पुलाजवळून गेलेल्या मोठ्या जलवाहिनीच्या 'जॉईंट'मधून घसघसून पाणी वाहत आहे. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीत बिघाड नेमका कसा झाला, ते समजू शकले नसले, तरी पुलाचे काम करताना जलवाहिनीचा जॉईंट सुटला असावा. असा अंदाज आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुरुस्ती सोडाच उलट ज्याठिकाणी पाणी घसघसून वाहत आहे, त्याठिकाणी कोणीतरी भलामोठा दगड ठेवला आहे.

जलवाहिनी पुन्हा फुटली

दोन महिन्यापूर्वी हीच जलवाहिनी पुलाच्या दुसऱ्या बाजूने फुटली होती. बरेच दिवस पाण्याची नाशाडी चालू होती. महिन्याहून अधिक काळ पाण्याचा अपयव्य सुरु होता. त्यासंबंधी दै. 'गोमन्तक' मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. आता हीच जलवाहिनी पुलाच्या दुसऱ्या बाजूने फुटली आहे.

एकाबाजूने डिचोलीतील काही भागात भर पावसातही पाण्याची समस्या असताना, दुसऱ्याबाजूने मात्र चक्क शहरात प्रचंड प्रमाणात पाण्याची नाशाडी चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT