Road Damaged Keri Sattari Dainik Gomantak
गोवा

Road Damaged: घोटेली सत्तरीतील भूमिगत वीजवाहिनीच्या कामामुळे रस्त्याला मोठे भगदाड...

केरी सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील मोरशी घोटेली 2 येथे भूमिगत वीज वाहिनी घालताना रस्त्याचे नुकसान

Kavya Powar

Road Damaged Keri Sattari

केरी सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील मोरशी घोटेली 2 येथे भूमिगत वीज वाहिनी खोदताना अंजुणे धरणाचा उपकालवव्याची वाहिनी फुटल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मशीनद्वारे अंतर्गत खोदकाम करताना धरणाच्या मुख्य कालव्यातून मोरशीला जाणाऱ्या उपकालव्याची भूमिगत वाहिनी फुटल्याने भुयारातून पाणी वाहत राहिले आणि या पाण्याच्या जोरावर रस्त्याच्या आतील संपूर्ण माती वाहून रस्त्याशेजारी असलेल्या जानू झोरे यांच्या बागायतीत घुसली.

काल (ता. 6) संध्याकाळी ही घटना घडलेली ही घटना काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे रात्रभर त्या कालव्याचे पाणी वाहत राहिले आणि त्यातून रस्त्याखालील माती वाहत राहिली आणि रस्त्याच्या आत मोठे भुयार निर्माण झाले.

तसेच ही वाहिलेली माती येथील रस्त्यावर आणि शेजारील बागायतीत घुसल्याने बागायतीची मोठी नुकसान झाली आहे. तसेच रस्ताही पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

दरम्यान आज पाहिजे जलसिंचन खात्याचे कर्मचारी येथील जलसिंचन प्रकल्पात कामाला आल्यावर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर धरणाच्या मुख्य कालव्याचे पाणी पुरवठा बंद केल्यावर हे पाणी वाहणे थांबले आणि पुढील अनर्थ ठळला.

या प्रकारामुळे पाण्याच्या झोताने रस्त्याखालील माती येथील जानू झोरे यांच्या माड पोफळीच्या बागायतीमध्ये घुसल्याने बागायतीमध्ये मातीचा थर जमा झाला आहे. त्याच्या सुमारे दोन एकर जमिनीमध्ये 700 पोफळी व 80 माड आहेत. माड पोफळीच्या मुळावर कालव्याची माती साचल्याने माड पोफळीचे मोठे नुकसान झाले आहे.

या संबंधी जानू झोरे यांनी सांगितले की, या प्रकारामुळे आपल्या माड पोफळीचे उत्पन्न कमी होणार आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने आपल्या बागायतीतील माती काढावी आणि आपली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

रस्त्याचेही मोठे नुकसान...

दरम्यान या प्रकारामुळे या कालव्याचा रस्ता आतून पूर्णपणे वाहून गेला असून आतमध्ये भले मोठे भुयार पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक बंद झाली आहे. हा रस्ता येथील लोकवस्ती तसेच शेती व ऊस उत्पादकांना गरजेचा असल्याने त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT