Water pipeline burst in mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया...

म्हापशामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

दैनिक गोमन्तक

Water pipeline burst in mapusa: म्हापसा मतदारसंघातील विविध ठिकाणी वारंवार पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सतत घडत आहेत. याकडे म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे

लोकांना पाण्याविना याचा त्रास होत आहे. पाण्याची टंचाई वारंवार लोकांना भासत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या एक महिन्यापासून एकतानगर हाऊसिंग बोर्ड, म्हापसा येथे अशीच पाईपलाईन फुटलेली असून त्यातून सतत पाणी रस्त्यावरून वाहत आहे आणि यावरून वाहने गेल्यावर होणारा चिखल चालत जाणाऱ्या लोकांवरती उडतो.

अशाच प्रकारे म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजजवळील रस्त्याच्या मधोमध एक पाईपलाईन फुटून सकाळपासून त्यामधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार दिसून आला. शुक्रवारी सायंकाळी त्या पाईपच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: वृश्चिक राशीच्या लोकांनो! या आठवड्यात नवीन संधी; करिअर, आर्थिक आणि आरोग्यात मोठे बदल

Ukraine Drone Attack: युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! तेल डेपोला भीषण आग; दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र

Bicholim: डिचोली बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर! वर्षअखेर स्वप्नपूर्ती होण्याचे संकेत, आमदारांचे प्रयत्न सुरू

Battle of Raichur: विश्वासघात, शौर्य आणि विजय! सम्राट कृष्णदेवरायांनी 'रायचूरची लढाई' कशी जिंकली?

Kadamba Bus Stand: 'हेच का ते खड्डेमय झालेले पंचतारांकित बसस्थानक'? गोवा काँग्रेसचा सवाल; रस्त्यावर ठिय्या मारून नोंदवला निषेध

SCROLL FOR NEXT