Mormugao Municipal Corporation employees Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी, जबाबदार कोण?

वेतन जमा न झाल्यास काम बंद ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

आठवड्यापूर्वी दोन दिवसात बँक कर्ज काढून वेतन खात्यात जमा केले जाईल असे आश्वासन देऊनही मूरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी आश्वासनपुर्ती करू न शकल्याने मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू लक्ष घालत नसल्याने हालाखीची परिस्थिती उद्भवली असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे.

'अ' दर्जाची मुरगाव (Mormugao) नगरपालिका थकबाकी वसुली संदर्भात सपशेल अपयशी ठरल्याने मेटाकुटीस आली आहे. याचा फटका मात्र पालिका कर्मचाऱ्यांना बसला आहे. पालिकेच्या अधोगतीला जबाबदार कोण आज प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

अधिकारी वर्गाला आपले वेतन वेळेवर मिळत आहे. कर्मचाऱ्यांना मात्र वेतनासाठी प्रत्येक महिन्याला झगडावे लागते असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. वेतनासाठी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे गेले तर एकच उत्तर कर्मचाऱ्यांना मिळते ते म्हणजे पालिकेची थकबाकी वसूली झाली नाही. पालिका तिजोरीत खडखडाट आहे. पुढच्या महिन्यात बघू हेच उत्तर वारंवार मिळत असल्याने काम करूनही वेतन मिळत नसेल तर रोजीरोटी कमवायची कशी, मुलांची शालेय फी, घरभाडे, कर्जबाजारी असलेल्यांना बँका हप्ता वसुलीसाठी तगादा लावतात.

हप्ता वसूल झाला नाही तर कर्जाच्या रकमेत वाढ होते. याच विवंचनेत कर्मचारी वर्ग सध्या दिवस काढत आहे. डिसेंबर महिन्याच्या 22 तारखेला वेतन हातात पडले होते. मात्र जानेवारी महिन्याचे वेतन आज पर्यंत फेब्रुवारी महिना संपत आला तरी खात्यात जमा होत नाही. आणखी एक महिना वेतन बँकेत जमा झाले नाही तर बँक खात्यातून मिळणारे वेतन हातात मिळणारच नाही.

कारण तोपर्यंत कर्जफेड रकमेत वाढ झालेली असणार बँक (bank) आपले हप्ते बरोबर वसूल करून घेणार आहे.याच विवंचनेत पालिका कर्मचारी सध्या वावरत आहेत.काय करावे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

दरम्यान अखिल गोवा पालिका (Corporation) कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी गेल्या आठवड्यात दोन दिवसात वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर आपण कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. मात्र त्यांचाही आजपर्यंत काहीच पत्ता नाही. त्यामुळे कर्मचारी अधिकच वैफल्यग्रस्त झाले आहे. वेतनाचा प्रश्न भेडसावत असूनही कामगार संघटनेचे अध्यक्ष फिरकले नसल्याचे कर्मचाऱ्यांत कडून सांगण्यात आले. तसेच फोनही घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत आहे. दोन दिवसात वेतन खात्यात जमा न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT