Water Shortage Problem Kulem, Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Water Problem: मोतीडोंगर भागात पाणी विभागाचा गलथानपणा

रामभरोसे कारभार : पाणी बिलाचा हफ्ता भरूनही कनेक्शनची तोडणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Water Problem: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचा गलथानपणा उघडकीस आला असून थकलेल्या पाणी बिलाचा हफ्ता भरूनही कनेक्शनची तोडणी मडगाव-मोती डोंगर येथील पाणी विभाग कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाने हेच का ते अच्छे दिन, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

मडगाव-मोतीडोंगर येथील पाणी कार्यालयाकडून मडगाव, नुवे, बाणावली, फातोर्डा अशा चार मतदारसंघांतील नळ जोडणी विभागाचे कामकाज चालत आहे. येथील पाण्याची थकित बिले भरणा करणाऱ्या नागरिकांच्या नळजोडण्या तोडण्यात येत असून मीटर काढून नेण्यात येत आहेत.

बिलाच्या हफ्त्याची रक्कम अदा केल्यानंतरही काहीजणांचे मीटर काढण्यात आले आहेत. याविषयी मोती डोंगर येथील अधिकाऱ्याला विचारले असता त्याने सांगितले की, इंटरनेट जोडणीचा सर्व्हर डाउन झाल्याने मीटर काढण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे.

मडगाव, नुवे, बाणावली, फातोर्डा अशा चार मतदारसंघांतील काम या ठिकाणाहून चालते. या मतदारसंघातील ज्यांची पाण्याची बिले थकित आहेत, त्यांची जोडणी तोडली जात आहे.

ओटीएस योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वेबसाईटवर ग्राहक क्रमांक व मोबाईल नंबर देऊन लॉग-इन केल्यानंतर त्या ठिकाणी थकित बिलांपैकी टप्प्याटप्प्यानुसार किती बिल भरावे लागेल याची माहिती मिळते, अशी माहिती एका अभियंत्याने दिली.

...तरीही कर्मचारी दारात

मालभाट येथील एका हफ्त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने परतफेड केलेल्या एस. गावकर यांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या हफ्त्याची रक्कम भरली होती. असे असतानाही 22 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी नळ जोडणी तोडण्यासाठी दाखल झाले. नंतर त्याच्याशी बोलणी केल्यानंतर ते निघून गेले.

रोख रकमेचा पर्याय नाही

पुन्हा मीटर जोडणीसाठी रोख रक्कम स्वीकारली जात नाही. राज्य सरकारकडून रोख रक्कम स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. डिमांड ड्राफ्ट, धनादेश किंवा पे ऑर्डर घेऊन पैसे भरले जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, उपस्थित नागरिकांकडून रोख रकमेचा पर्याय असता तर काम लवकर झाले असते, असे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT