Water Issue in Goa Dainik Gomantak
गोवा

Water Issue : ठाणे पंचायत क्षेत्रातील डोंगुर्लीत पाण्याविना नागरिकांचे हाल; महिलांची पाणी कार्यालयात धाव

ठाणे पंचायत क्षेत्रातील डोंगुर्ली येथे गेल्या काही दिवसांपासून वारंवार नळाला पाणी नसल्याने गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Water Issue in Goa : ठाणे पंचायत क्षेत्रातील डोंगुर्ली येथे गेल्या काही दिवसांपासून वारंवार नळाला पाणी नसल्याने गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यात टॅंकर दोन दिवसाने येत असल्याने गावातील महिला नाराज झाल्या आहेत.

नदीचे पाणी सुध्दा आटले असून जेव्हा नळाला पाणी सोडले जाते त्यावेळी ते गढूळ येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते हानीकारक आहे असे महिलांचे म्हणणे आहे.

पाणी सोडणाऱ्या माणसाला वारंवार ह्या महिला नळ कोरडे असल्याची तक्रारी करत आहेत. त्यामुळे आज 12 च्या सुमारास वाळपई पाणी पुरवठा कार्यालयावर ह्या महिलांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र कार्यालयात अधिकारी नसल्याचे कळले. यावेळी डोंगुर्ली गावातील 10 महिला उपस्थित होत्या.

डोंगुर्ली परिसरात सुरळीत पाणी सोडावे अशी मागणी मंजीरी गावकर, माधवी च्यारी आणि इतर उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT