Water issues goa Dainik Gomantak
गोवा

Water Issue In Goa: भरपावसात दोन आठवड्यांपासून नळ कोरडे; चिखली-कोलवाळ येथे पाणीटंचाई

Colvale Water Issue: सुमारे दीडशे ते दोनशे घरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

राज्‍यात मुसळधार पाऊस पडत असूनही मागील दोन आठवड्यांपासून चिखली-कोलवाळ येथील नळ कोरडे असल्‍याने संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. या गावातील सुमारे दीडशे ते दोनशे घरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत बोलताना कोलवाळ सरपंच दशरथ बिचोलकर यांनी सांगितले की, चिखली गावात मागील १४ दिवसांपासून पाण्याची समस्या जटील बनली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येची माहिती देण्‍यात आली, परंतु त्‍यांच्‍याकडून फक्त आश्‍‍वासनेच मिळाली.

कोलवाळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ व ४ मध्ये हा चिखली गाव येतो. तेथील नळांना गेले १४ दिवस पाणी न येण्याचा प्रकार यावर्षी पहिल्यांदाच घडलाय. गावातील मुख्य जलकुंभातच पाणी नसल्यामुळे नळ कोरडे पडले आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास सार्वजनिक बांधकाम खात्‍यावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा चिखलीवासीयांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Legends T20 League Goa: शेन वॉटसन, शिखर धवन, हरभजन सिंग खेळणार गोव्यात! वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेटचा थरार

Tuyem Hospital: तुये इस्‍पितळात होणार 12 ‘ओपीडीं’चा समावेश! आरोलकरांची ग्‍वाही; लवकरच गोमेकॉशी होणार लिंक

Goa Tourism: गोवा हाऊसफुल! Long Weekend मुळे किनाऱ्यांवर गर्दी; विदेशी पर्यटक मात्र गायब..

Khandola: 'गावपण उद्ध्वस्त करणारा प्रकल्प नकोच'! ‘गेरा’ प्रोजेक्टविरुद्ध खांडोळावासीयांचा एल्गार; ग्रामसभेत ठराव मंजूर

"..तो सांगतो, गोवा जगण्यासाठी छान जागा"! दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले प्रेम; गोव्यात खेळणार लीजेंड्स T20 लीग

SCROLL FOR NEXT