Water Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Dam: आंबे धुलै बंधाऱ्याचे पाणी प्लेट्‌स घालून अडविले

अभियंता सदानंद नाईक: शेतकऱ्यांना होणार फायदा; विहिरींत पाणी साचणार

दैनिक गोमन्तक

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेखाली 192 प्लेट्स घालून आंबे धुलै येथील बंधाऱ्याचे दीड लाख क्युबिक मीटर पाणी अडवलेले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा पूर्णपणे फायदा होईल. या परिसरात असलेल्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचणार असल्याचे साहाय्यक अभियंता सदानंद नाईक यांनी सांगितले.

खांडेपार नदीत एकूण 14 बंधारे आहेत. त्यापैकी ओकांब, शिग्नेव्हाळ, कुंभारवाडा आंबे, धावकोंड, तातोडी, कोडली, माटोजेवाडा, वेळीपवाडा, शिगाव, बिंबल, कुळे एक व कुळे दोन असे बंधारे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली बांधलेले आहेत. खांडेपार नदीत असलेल्या सर्वही बंधाऱ्यांत प्लेट्स घालण्यात आलेले आहेत. सर्व बंधाऱ्यांचे अडवलेले एकूण 28 लाख क्युबिक मीटर पाणी तुंबलेले आहे. अडवलेल्या पाण्यामुळे त्या त्या परिसरातील जमीन आतून थंडगार होत असते. त्याचा पुरेपूर फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेखाली घालण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याच्या कमतरतेवेळी ओपा प्रकल्पाला पुरेसे पाणी मिळत आहे.

खांडेपार नदीत एकूण 14 बंधारे आहेत. त्यापैकी ओकांब, शिग्नेव्हाळ, कुंभारवाडा आंबे, धावकोंड, तातोडी, कोडली, माटोजेवाडा, वेळीपवाडा, शिगाव, बिंबल, कुळे एक व कुळे दोन असे बंधारे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली बांधलेले आहेत. खांडेपार नदीत असलेल्या सर्वही बंधाऱ्यांत प्लेट्स घालण्यात आलेले आहेत.

सर्व बंधाऱ्यांचे अडवलेले एकूण 28 लाख क्युबिक मीटर पाणी तुंबलेले आहे. अडवलेल्या पाण्यामुळे त्या त्या परिसरातील जमीन आतून थंडगार होत असते. त्याचा पुरेपूर फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेखाली घालण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याच्या कमतरतेवेळी ओपा प्रकल्पाला पुरेसे पाणी मिळत आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी...

खांडेपार नदीत 14ही बंधाऱ्यांना प्लेट्स घालून पाणी अडविल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे. नागरिकांनी अंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी जाताना सावधगिरी बाळगावी. तसेच लहान मुलांनी वाढलेल्या पाण्याच्या पातळीपासून दूर राहावे, असे आवाहनही साहाय्यक अभियंता सदानंद नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT