Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Opa Pipeline Leakage: गांजे-उसगावात जलवाहिनी फुटली

दुरुस्तीला वेग : मात्र, सार्वजनिक पाणीपुरवठा सुरळीत : पाण्याची प्रचंड नासाडी

गोमन्तक डिजिटल टीम

Opa Pipeline Leakage: गांजे-उसगाव येथे बुधवारी रात्री ओपा जलप्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी वाहिनी फुटल्याने बाका प्रसंग उद्‍भवला. या वाहिनीचे पाणी बंद केल्यानंतर दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले.

गांजेतील हे पाणी ओपा प्रकल्पासाठी खांडेपार नदीत सोडले जाते. त्यामुळे पाणी वितरणावर परिणाम झाला नाही. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. ओपाला पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर 600 एमएम व्यासाच्या जुन्या वाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

तीनवेळा तोच प्रकार

गांजे प्रकल्पातून ओपा जलप्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी ही वाहिनी आठवड्याभरात तीनवेळा फुटली. ही वाहिनी फुटल्यामुळे ओपा जलप्रकल्पावर थोडा ताण आला; पण दूधसागर नदीवरील तीन बंधारे ओपा प्रकल्पासाठी खुले केल्याने ओपाची पाणी पातळी वाढली.

गांजेतील पाणी बंद झाल्यामुळे ओपातील पाण्याची पातळी खालावली होती, ती बंधाऱ्यांमुळे आता सुस्थितीत आहे.

..तर मर्यादित पाणीपुरवठा!

यंदा मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ओपा प्रकल्पाची पातळी २.७० मीटरवर आली असून ती आणखी घसरल्यास फोंडा व तिसवाडी तालुक्याला मर्यादित पाणीपुरवठा करावा लागेल.

सध्या तरी व्यवस्थित पुरवठा सुरू आहे. पण पावसाळा सुरू होईपर्यंत ही स्थिती राहील, अशी शक्यता वाटत नसल्याने खात्याच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT