OTS Server Down Water Bill Dainik Gomantak
गोवा

Canacona News : दररोज तासभरच मिळते पाणी, सहा महिन्यांनी आलेले पाणी बिल पाहून डोळे फिरले

कुस्केतील गजानन वेळीप यांची खंत

दैनिक गोमन्तक डिजिटल

‘सरकारच्या घोषणाच मोठ्या’, असे म्हणण्याची वेळ खोतीगावातील कुस्के या वाड्यावरील रहिवाशांवर आली आहे. या वाड्याला दिवसाकाठी एक तासही पाणीपुरवठा होत नाही. मात्र, येथील गजानन वेळीप यांना 16 हजार लिटरचे पाणी बिल आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा खात्याच्या निर्देशाप्रमाणे ग्राहकास दरमहा 16 हजार लिटरपर्यंत मोफत पाणी पुरवठा होतो. मात्र, तब्बल सहा महिन्यांनी पाणी बिल आल्यानंतर ते 16 हजार लिटरपेक्षा जास्त झाल्याने त्याचा नाहक भुर्दंड बसत असल्याचे कुस्के - खोतीगाव येथील ग्राहक गजानन पावटो वेळीप यांनी सांगितले. पाणी खात्याने ग्राहकाला दरमहा पाणी बिल देणे बंधनकारक आहे.

पाणीपुरवठा खाते 16 हजार लिटरपर्यंत पाणी मोफत देते. मात्र, त्यानंतर एक लिटरही पाण्याचा जास्त वापर झाल्यास त्याचे सरसकट बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात येते. याबद्दल वेळीप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासंबंधी बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात आल्यानंतर नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. तसेच सहा महिन्यांनी एकत्रित पाणी बिले दिली जातात, अशीही ग्राहकांची तक्रार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT