Court | Dainik Gomantak
गोवा

Waste Disposal: ‘एमआरएफ’वरून खंडपीठाने चार पंचायतींना खडसावले

कचरा विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेली मटेरियल रिकव्हरी सुविधा (एमआरएफ) कार्यरत न ठेवल्याबद्दल गोवा खंडपीठाने ग्रामपंचायतींना फटकारले.

दैनिक गोमन्तक

Waste Disposal: कचरा विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेली मटेरियल रिकव्हरी सुविधा (एमआरएफ) कार्यरत न ठेवल्याबद्दल गोवा खंडपीठाने मोरजी, गिरी, रेईश मागूश व विर्नोडा ग्रामपंचायतींना फटकारले. पंचायतीकडून होत असलेल्या टोलवाटोलवी प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाला ही सुविधा कार्यरत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित पंचायतीच्या सचिवांनी पुढील सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचा इशारा खंडपीठाने दिला.

मागील सुनावणीवेळी खंडपीठाने कोलवा, सेंट लॉरेन्स, मोरजी, गिरी, रेईश मागूश व विर्नोडा या सहा पंचायतींनी एमआरएफ सुविधा कार्यरत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या पंचायतींनी तयार केलेल्या सुविधांची माहिती घेतली.

कोलवा पंचायतीने एमआरएफ सुविधा कार्यरत झाली असल्याचे सांगितले. मात्र, त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप घेतला ही पूर्ण कार्यरत झाली नसून ती कायमस्वरुपी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पंचायतीने आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी अवमान प्रक्रिया सुरू करण्याची गरज असल्याची बाजू मांडली.

कोलवा पंचायतीच्या वकिलांनी ही सुविधा कार्यरत झाली असल्याचा दावा केला. त्यामुळे खंडपीठाने त्याची अचानक कधीही तपासणी करण्याचे निर्देश दिले. कोलवा परिसरात कचरा उचलण्याच्या कामात वाढ करण्याची शिफारस पंचायत गटविकास अधिकाऱ्यांनी केली आहे त्याची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या.

सेंट लॉरेन्सने दंड केला जमा

सेंट लॉरेन्स पंचायतीला एमआरएफ सुविधा कार्यरत करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या पंचायतीला एमआरएफ सुविधा दिलेल्या मुदतीत कार्यरत न केल्याप्रकरणी गोवा खंडपीठाने 1 लाख 10 हजाराचा दंड ठोठावला होता. तो जमा करण्यात आला आहे.

मोरजी पंचयातीच्या सरपंच व सचिवांना नोटीस बजावण्यात आली होती. एमआरएफ सुविधा कार्यरत कऱण्यात आल्याची माहिती देण्यात आली तरी जेव्हा त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली तेव्हा ती बंद होती. ही सुविधा पूर्ण करण्यास 4 आठवड्याची मुदत देण्यात येत आहे.

प्रदूषण मंडळाने अचानक केलेल्या तपासणीवेळी जर ही सुविधा कार्यरत नसल्याचे आढळून आल्यास सचिवांनी पुढील सुनावणीवेळी उपस्थित राहावे, असे खंडपीठाने बजावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT