Canacona : काणकोणातील मच्छीमारांचा इशारा..  Dainik Gomantak
गोवा

संरक्षण द्या, अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडू..!

काणकोणातील मच्छीमारांचा इशारा..

दैनिक गोमन्तक

Goa Politics : येत्‍या आठ दिवसांत तळपण जेटीवर तटरक्षक दलाला हायस्पीड गस्तीची बोट देऊन काणकोणातील (Canacona) मच्छीमारांना (Fishermen)संरक्षण द्या, अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा तळपण मच्छीमार व्यावसायिकांच्या सभेत देण्यात आला.

Canacona

25 नोव्हेंबरला काणकोणमधील मच्छीमारांवर समुद्रात लोखंडी गोळ्यांचा बेछूट मारा मालपे-कर्नाटक येथील हायस्पीड बोटीवरील मच्छीमारांनी केला होता. त्‍यामुळे या मच्‍छीमारांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काणकोमधील व्यावसायिकांनी त्यांची सुमारे तीन लाख किमतीची जाळी जप्त केली. मात्र तटरक्षक दलाने पंचनामा करण्यापलीकडे काहीच केले नाही. त्या बोटमालकाविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. मत्स्योद्योग खात्यानेही काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप माजी नगराध्यक्ष रत्‍नाकर धुरी यांनी केला.

यावेळी गोवा ‘आप’चे स्थानिक नेते अनुप कुडतरकर, माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी, काँग्रेस गटाध्यक्ष जनार्दन भंडारी यांचीही उपस्‍थिती होती. त्‍यांनी सरकारच्‍या अकार्यक्षमतेबद्दल टीका केली. पंच रूद्रेश नमशीकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

एलईडी मासेमारी त्‍वरित बंद करा

एलईडी मासेमारी आठ दिवसांत बंद न केल्यास आंदोलन करण्‍याचा इशाराही या बैठकीत देण्‍यात आला. नॅशनल फिशरीज फोरमचे जनरल सेक्रेटरी ओलान्‍सियो सिमॉईश यांनी हा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी पाठिंबा दिला. गोव्याच्या हद्दीत घुसखोरी करून करण्यात येणारी मासेमारी बंद करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी ओल्ड क्रॉस फिशरमन असोसिएशनचे कुस्तोडियो डिसोझा, अध्यक्ष अशोक धुरी, गाबित समाजाचे अध्यक्ष तुळशीदास ठक्कर यांनी सरकार मत्स्यव्यावसायिकांना संरक्षण देण्यास अपयशी ठरत असल्‍याचा आरोप केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी सहा दिवसांत गोवा व कर्नाटक मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्‍न करेन. तळपण किनाऱ्यावर संरक्षक भिंत, जाळी विणण्याच्या वास्तूचे नूतनीकरण व अन्य विकासकामे करण्यात आलेली आहेत. मासेमारी हे येथील रहिवाशांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यांच्या लढ्याला सदैव आपला पाठिंबा असेल.

- इजिदोर फर्नांडिस, काणकोणचे आमदार तथा उपसभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT