Mormugao Municipality  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिकेच्या रोजंदारी कामगारांना पगाराची प्रतीक्षा

मुरगाव पालिकेचा घोळ: सफाई कर्मचाऱ्यांची गोची

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन खात्यात शुक्रवारी जमा झाले. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मात्र एकाच महिन्याचे वेतन दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या वेतनात वाढीव 200 रुपये दिले नसल्यानेही त्यांच्यात नाराजी पसरली आहे.मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कामगारांना वेतन देणे कठीण झाले आहे. कामगार वर्गाला डिसेंबर 22 तारखेला वेतन देण्यात आले होते. त्यानंतर कामगार वर्गाला जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नव्हते. संप करण्याऐवजी आणखी दोन दिवस थांबू, असे म्हणता म्हणता महिना उलटला.

मात्र, ठरलेल्या तारखेला वेतन मिळालेच नाही. यासंबंधी मुरगाव पालिकेला नोटीस देणार असल्याचे ठरले. मात्र त्यांना कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हवे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्यातच चलबिचल सुरू झाली. मध्यंतरी कामगार संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर यांनी पालिकेत येऊन वेतनासंदर्भात पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर वेतनाची पुन्हा तारीख देण्यात आली.

मात्र, पुन्हा एकदा पुन्हा येरे माझ्या मागल्या. शेवटी शुक्रवारी एका महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पक्के झाले. याची कर्मचाऱ्यांना चाहूल लागताच त्यांनी ते न स्वीकारण्याचा निर्धार केला. मग त्यांची वरिष्ठांची बोलणी झाल्यानंतर शेवटी दोन महिन्याचे वेतन खात्यात जमा झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

दरम्यान, रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या खात्यात फक्त एका महिन्याचे वेतन जमा करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना त्यांची रोजंदारी 500 वरून 700 रुपये करण्यात आली होती. ती वाढीव रोजंदारी मात्र, अद्याप देण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाढीव पगारही न मिळाल्याने कामगारांत संताप

मुरगाव पालिकेकडे सफाई कर्मचारी म्हणून कित्येक वर्षे काम करणारे कर्मचारी रोजंदारीवर काम करतात.मात्र, या रोजंदारी कामगारांना त्यांचा दिवसाचा पगार पाचशे रुपयांवरून प्रतिदिन 700 रुपये करण्यात आला. मात्र, या वाढीव पगाराचाही पत्ता नाही. दोन महिन्यांच्या पगाराऐवजी एका महिन्याचा पगार देऊन त्यांची बोळवण केल्याने कामगारांची गोची झाली असून त्यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT